Posts

Showing posts from November, 2017

डागरहित त्वचेसाठी मिठाचे फेशियल स्क्रब

Image
डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे. डागरहित त्वचेसाठी एका बाउलमध्ये मिठात काही थेंब लिंबाचा रस टाकून हलक्या हाताने स्क्रब करा. याने पुरळ, मृत त्वचा, ब्लॅक आणि व्हाईट हेड दूर होतात. हे स्क्रब आठवड्यातून दोनदा प्रयोगात आणू शकता. पिंपल्स दूर करण्यासाठी त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या तेलात मीठ टाकून स्क्रब करावे. याने पिंपल्स नाहीसे होतील. आपण बदामाचे तेलही वापरू शकता. पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसळून चेहर्‍यावर स्क्रब करावे. टॅनिंग दूर करण्यासाठी काळ्या मिठाचे स्क्रब चांगले परिणाम देतं. एका चमचा मधात थोडे मीठ मिसळून चेहर्‍यावर लावल्याने सन टॅनिंग दूर होईल. स्क्रब करण्याचे नियम स्क्रब केल्याने मृत त्वचा बाहेर पडते आणि ग्लो येतो. पण अधिक स्क्रब केल्याने त्वचेला नुकसानही होऊ शकतं. म्हणून रोज स्क्रब करू नये. आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रब करावे. स्क्रब नेहमी हलक्या हाताने करावे. स्क्रबिंग करण्यापूर्वी चेहरा धुऊ...

काय आहे मॉईश्चरायझर आणि सिरम?

Image
बाजारात दर दोन दिवसांनी नवी स्कीन आणि हेअर केअर प्रोडक्ट्स येत असतात. या प्रोडक्ट्सच नेमकं काम काय, हेच आपल्याला कळत नाही. मॉईश्चरायझर असो किंवा सिरम, सगळं सारखचं वाटतं. फेशियल सिरम आणि मॉईश्चरायझरबद्दलही आपला असाच गोंधळ उडतो. या दोघांमधला नेमका फरक जाणून घेऊया... * मॉईश्चरायझर लोशन आणि क्रीम अशा दोन्ही प्रकारांमध्ये मिळतो. त्वचेला ओलावा टिकवून ठेवणं हे मॉईश्चरायझरमुळे त्वचा कोरडी पडत नाही. मॉईश्चरायझरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण असतं. यामुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो. * फेशियल सिरममुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. सिरममुळे तुमचा चेहरा ताजा, टवटवीत आणि तरूण दिसतो. सिरममध्ये 'क' आणि 'ई' जीवनसत्व असतं. तसंच यात अँटी ऑक्सिडंट्‍सही असतात. सिरममुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो.

7 दिवसात स्वच्छ करा काळी मान

Image
उन्हाने गळ्यावर टेनिंग होऊन जाते ज्याने आपला चेहरा जरी गोरा दिसतं असेल तरी मान काळीच दिसते. बेकिंग सोड्याच्या मदतीने मान स्वच्छ केली जाऊ शकते. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. कशी तयार कराल ही पेस्ट: -> एका बाऊलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. -> आता या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. नारळाच्या तेलाने घाण निघून जाते आणि पोर्स स्वच्छ होतात. -> आता एका नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या आणि 2 मिनिट तसेच राहू द्या. टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने पोर्स खुलतील. -> आता पॅक लावण्यापूर्वी आधी पेच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसल्यास मानेवर लावा. -> या पॅकची हलकी लेयर मानेवर लावा. 15 मिनिट तसेच राहू द्या. वाळू लागल्यावर पाण्याच्या मदतीने...

निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स

Image
तुमची त्वचा दैनंदिन धावपळीचा ताण सहन करते असते, तेव्हा ती वार्धक्याकडे झुकण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हांला निरोगी त्वचेसाठी या सामान्य टिप्सची गरज लागते आणि खरेच आमच्यावर विश्‍वास ठेवा, तुम्हांला अगदी कमी वेळात उत्तम परिणाम पाहून निश्‍चितच अत्यानंद होईल! निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स 1) प्रदूषणाला नाही म्हणा प्रदूषण, धूर आणि आपल्या धावपळीच्या जीवनातील अनारोग्यकारक सवयी यांच्यामु़ळे आपल्या त्वचेची छिद्रे बंद होऊन आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी उपाय म्हणून, आम्ही पॉन्ड्सच्या प्युअर व्हाइट डीप क्लिंजिंग फेशिअल फोमवर विश्‍वास ठेवतो. जो ॲक्टिव्हेटेड कार्बन आणि बी3 जीवनसत्त्व यांच्यासह तयार केला गेला आहे. हा अशा एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करतो जो त्वचेच्या छिद्रांमध्ये पोहचून त्यांत असलेली कोणतीही अस्वच्छता काढून टाकतो. स्वच्छ, तेजस्वी त्वचा आता तुमच्यापासून फक्त एक वॉश दूर आहे! 2) उत्सव सौंदर्यवर्धक निद्रेचा जरी गॅजेट्स आणि पार्टीज या भुरळ पाडणार्‍या असल्या, तरीही झोपी जाण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. जेव्ह...

घरी डाय करत असाल तर घ्या ही काळजी...

Image
* डाय किंवा हेअर कलरचा दर्जा आणि प्रमाण यांची सांगड घाला. * केस शॉर्ट असतील तर एकाच वेळी पूर्ण पॅक न वापरता अर्धाच मिक्स करा. गरज असेल तरच पूर्ण पॅक वापरा. शिल्लक पॅक पुन्हा व्यवस्थित बंदिस्त करा. * डाय करताना आधी स्कीन टेस्ट करा, अन्यथा रॅशमुळे चेहर्‍याची, कानामागची, त्वचा काळी पडू शकते. * डाय लावताना ऑईल बेस निवडावा वा डाय धुतल्यानंतर ऑईल मसाज करावा. कारण डाय वा हेअर कलरमुळे केस, त्वचा कोरडी, रुक्ष होते, त्वचा ऑईल बेस कमी होतो. त्यामुळे नव्याने येणार्‍या केसांचे पोषण योग्य प्रमाणात होत नाही. * डाय वा हेअर कलर वापरणार्‍यांनी परिपूर्ण आहार, झोप, पिण्याच्या पाण्याचे संतुलित प्रमाण ठेवावे म्हणजे. डायचा त्रास होणार नाही. * डाय, कलर पॅकसोबत दिलेल्या सूचना अवश्य वाचा. जर रॅश, अॅलर्जी असे काही आढळले, तर त्वरित स्कीन स्पेशालिस्टकडे जा. घरगुती उपचार नकोत.

अॅलर्जी असणार्‍या त्वचेसाठी मेकअप

Image
त्वचा संवेदनशील असेल तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. कोणतंही मेक अप प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याचं त्वचेवर परीक्षण करणं गरजेचं ठरतं. अॅलर्जीमुळे अनेक मेक अप प्रॉडक्ट वापरणं अवघड होऊन बसतं. अॅ‍लर्जिक त्वचेचा मेक अप कसा करावा याविषयी... * अॅलर्जिक त्वचा असणार्‍या व्यक्तींनी मेक अपची सुरुवात क्लिंजिंग आणि मॉईश्चरायझिंगने करावी. त्यानंतर फाउंडेशनचा अत्यंत पातळ थर लावून घ्यावा. * नंतर चीकबोन्सच्या थोडं खाली, नाकाच्या दोन्ही बाजूला आणि कपाळाच्या बाजूंना ब्रोंजर लावा. नाकला अधिक उठाव येण्यासाठी काँट्युर मेक अप करा. * अॅलर्जिक त्वचा असणार्‍यांनी डोळ्यासाठी मेक अपची उत्पादनं खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. * टिश्यू आणि मेक अप ब्रशचा वापर टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्याऐवजी सुती रुमालाचा वापर करावा. * अँलर्जीमध्ये डोळ्याखालच्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंडर आय क्रीम लावावं. * कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेसाठी कितपत उपयोग ठरेल याची माहिती घ्या. * अॅलर्जिक स्कीन असणार्‍यांनी शक्यतो स्वत:चे मेक अप प्रॉडक...

थंडीत त्वचेची काळजी घ्या!

Image
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तिची योग्य ती काळजी घेणे जरूरीचे असते. ही काळजी कशी घ्यावी याची ही माहिती. त्वचेच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळे साबण बाजारात उपलब्ध आहेत. थंडीत जास्त तेल असणारे (टीएफएम) चांगल्या प्रतीचे साबण वापरावेत. टीएफएम जेवढा जास्त तेवढे साबणातले Oily Ingredent जास्त साबणात वापरलेली चरबी ही प्राणीज किंवा वनस्पतीज चरबी जवळजवळ सारख्याच प्रमाणात त्वचेला तेलकटपणा (मृदुता) देते. पण प्राणीज चरबी (Fat) वापरल्याने काही जणांना एलर्जी होऊ शकते. म्हणून एलर्जीक असणार्‍यांनी प्राणीज चरबीपासून बनवलेले साबण, क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नये. थंडीत आंघोळीनंतर शरीर खसखसून न पुसता हळूच टिपावे. तेलाच्या हाताने हलकी मॉलिश करावी. त्यानंतर लगेच त्यावर पाणी टाकून किंवा पुसू नये, नाहीतर जे पाणी त्वचेत सामावले आहे ते उडून पुन्हा त्वचा कोरडी होईल. सर्वसाधारणपणे खोबरेल तेलच लावावे. थंडीत ते घट्ट होत असल्याने काही लोक मोहरीचे (सरसो) तेल लावतात. सामान्य त्वचेसाठी ते ठिक आहे पण एलर्जीक व जास्त कोरडी त्वचा असणार्‍या लोकांना त्यामुळे जास्तच त्रास होतो. या दोन तेलांखेरीज गोडं तेल...

चेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा

Image
आपण चेहर्‍यासाठी घरगुती पॅक तयार करत असाल तर त्यात लिंबू नक्की वापरत असाल. परंतू अनेकदा बघण्यात आले आहे की लिंबू वापरल्याने रॅशेज किंवा जळजळ सारख्या समस्या उद्भवतात. लिंबाची प्रकृती आम्लिक असल्यामुळे याने त्वचेवर विपरित परिणाम होतो. जर आपल्याला याने अॅलजी असेल तर लिंबू वापरणे टाळा. अनेकदा चांगल्या परिणामासाठी लिंबाचा अधिक उपयोग केला जातो आणि परिणामस्वरूप त्वचेवर पांढरे डाग, किंवा सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा खाजही सुटायला लागते. लिंबात फोटोसिंथेसाइजिंग कंपाउंड असतात जे त्वचेला यूव्ही रेजप्रती संवेदनशील ठेवतात. ज्यामुळे चेहर्‍यावर पिग्मेंटेशन होऊ शकतं. यापेक्षा सकाळी एक कप पाण्यात लिंबू पिळून पिऊन घ्या. याने शरीर डिटॉक्सीफाय होऊन जातं. लिंबू वापरण्यापूर्वी हे लक्षात असू द्या: आपल्याला लिंबू वापरण्यापूर्वी आपली त्वचा कसी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपली त्वचा ड्राय किंवा फ्लॅकी आहे तर लिंबू वापरणे टाळा. चेहर्‍यावर पुरळ, जखम असल्यास लिंबू वापरू नये, जळजळ होऊ शकते. लिंबाने त्वचा हाईड्रेड होते म्हणून हे फायदेशीर आहे परंतू वापरण्यापूर्वी चेहरा मॉइस्चर करून घ्या. लिंबाचा ...

कसलेली आणि स्वच्छ स्कीनसाठी 8 नैसर्गिक उपाय

Image
अनेकदा चेहर्‍याची त्वचा लटकून जाते आणि चमकही नाहीशी होऊन जाते. अनियमित आहार, ऊन, वयाप्रमाणे आणि इतर काही निष्काळजीचा प्रभाव चेहर्‍यावर होत असतो. चेहर्‍याची त्वचा टाईट करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात उत्तम पर्याय ठरतात. येथे आम्ही 8 नैसर्गिक उपाय देत आहोत ज्याने आपल्या चेहर्‍याला पोषण मिळेल. बर्न स्कीनवर कोरफड जादूप्रमाणे प्रभाव सोडतं. 15 मिनिट कोरफड जेल त्वचेवर घासल्याने प्रभाव दिसू लागतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय अमलात आणावा. मध मिसळून याचा प्रभाव वाढवता येईल. काकडी 30 मिनिटापर्यंत काकडीचा रस चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने डाग, सुरकुत्या आणि सूज कमी होण्यात मदत मिळेल. दालचिनी दालचिनी वापरल्याने चेहर्‍याचे तारुण्य कायम राहतं. परंतू नुसती दालचिनी वापरणे योग्य नाही. म्हणून हळद आणि दालचिनी पावडर सममात्रेत मिसळा. याची पेस्ट तयार करण्यासाठी जैतुनचे तेल वापरा. ही पेस्ट लावून वाळल्यावर धुऊन टाका. नंतर साखरेच्या दाण्यांनी 5 मिनिटापर्यंत चेहरा घासा. पुन्हा धुवा. आठवड्यातून दोनदा ही क्रिया अमलात आणा. खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून प...

चेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा

Image
आपण चेहर्‍यासाठी घरगुती पॅक तयार करत असाल तर त्यात लिंबू नक्की वापरत असाल. परंतू अनेकदा बघण्यात आले आहे की लिंबू वापरल्याने रॅशेज किंवा जळजळ सारख्या समस्या उद्भवतात. लिंबाची प्रकृती आम्लिक असल्यामुळे याने त्वचेवर विपरित परिणाम होतो. जर आपल्याला याने अॅलजी असेल तर लिंबू वापरणे टाळा. अनेकदा चांगल्या परिणामासाठी लिंबाचा अधिक उपयोग केला जातो आणि परिणामस्वरूप त्वचेवर पांढरे डाग, किंवा सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा खाजही सुटायला लागते. लिंबात फोटोसिंथेसाइजिंग कंपाउंड असतात जे त्वचेला यूव्ही रेजप्रती संवेदनशील ठेवतात. ज्यामुळे चेहर्‍यावर पिग्मेंटेशन होऊ शकतं. यापेक्षा सकाळी एक कप पाण्यात लिंबू पिळून पिऊन घ्या. याने शरीर डिटॉक्सीफाय होऊन जातं. लिंबू वापरण्यापूर्वी हे लक्षात असू द्या: आपल्याला लिंबू वापरण्यापूर्वी आपली त्वचा कसी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपली त्वचा ड्राय किंवा फ्लॅकी आहे तर लिंबू वापरणे टाळा. चेहर्‍यावर पुरळ, जखम असल्यास लिंबू वापरू नये, जळजळ होऊ शकते. लिंबाने त्वचा हाईड्रेड होते म्हणून हे फायदेशीर आहे परंतू वापरण्यापूर्वी चेहरा मॉइस्चर करून घ्या. लिंबाच...

मुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी

Image
सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे .  नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपावे .  कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे .  face-mask-for-oily-skinतेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम होईल .  मुरुमावर औषधी क्रीम लावावे .  लवंग व मिरी तेलाचे थेंब असलेले कॅलमाईन मुरुमावर लावावे . दुपारी परत चेहरा सध्या पाण्याने धुऊन Astrinjunt लावून मग क्रीम लावावे . रात्री सकाळी केल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ धुऊन क्लेंझर , Astrinjunt लावावे .  मग क्लीअरसिलसारखे औषध लावावे .  मॉइश्चरायझरही लावता येईल .  मुरुमे असल्यास ती कमी करण्यासाठी पुढील कृती करावी . १)      मुरुमांना खूप हाताळू नये . २)     ऑईल बेस क्रीम लावू नये . ३)     खूप तळण वगैरे तळू नये , कारण उडणारे तेल व धूर त्वचेसाठी योग्य नाही . ४)     ताणरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा .

डार्क सर्कल दूर करण्यासाठी मधाचे 5 उपाय

Image
डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणं आहेत, जसे योग्य डाइट न घेणे, शरीरात पोषक तत्त्वांची कमी, कमजोरी, झोप पूर्ण न होणे आणि इतर. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊनही डार्क सर्कल्स जात नसतील तर काही घरगुती उपायाने हे दूर केले जाऊ शकतात. मधात नैसर्गिक रूपात ब्लिचिंग गुण आढळतात ज्याने सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यात मदत मिळते. याच्या अॅटीऑक्सीडेंट प्रकृतीमुळे डार्क सर्कलवर हे खूप प्रभावी ठरतं. जाणून घ्या कश्या प्रकारे हे डार्क सर्कल्स दूर करण्यात मदत करतं ते: शुद्ध मध:  डार्क सर्कल्स वर मधाची एक पातळ लेअर लावा आणि 20 मिनिटापर्यंत हळूवार मालीश करा. नंतर पाण्याने धुऊन टाका. मध, व्हि‍टॅमिन इ आणि अंड्यातील पांढरा भाग:  व्हिटॅमिन इ कॅप्सूल वाटून त्यात मध आणि अंड्यातील पांढरा भाग मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली लावा. वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. मध आणि बदाम:  सम प्रमाणात मध आणि बदामाचे तेल मिसळा. हे डोळ्या जवळच्या भागाला लावून हलक्या हाताने मालीश करा. रात्री असेच राहून द्या. सकाळी उठून घुऊन टाका. मध आणि केळ:  एका बाऊलमध्ये मध आणि तेवढ्या प्रमाणात केळ मिसळा....

हिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय

Image
हिवाळ्यात त्वचाच नाही तर केसही ड्राय आणि बेजान होऊन जातात, आणि केसांना अतिरिक्त पोषणाची गरज असते. या मोसमध्ये केस गळणे एक मोठी समस्या आहे आणि यावर उपाय करणे आवश्यक आहे. जाणून घ्या याचे कारण आणि त्यावर उपाय. कारणं- पोषणाची कमी एक मुख्य कारण आहे, याव्यतिरिक्त अजूनही काही कारणं आहे ज्यामुळे केस गळतात: > ताण एनिमिया केसांवर वेगवेगळे प्रयोग व्हिटॅमिन बी ची कमतरता प्रोटीनची कमतरता हाइपो थॉयरॉडिज्म डैंड्रफ बोरिंगच्य पाण्याने केस धुणे अनुवांशिक केसांच्या मुळात इंफेक्शन केस गळती थांबवण्यासाठी त्याचे कारण ओळखून आणि त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. आता जाणून घ्या 5 कारगर उपाय जे केस गळती थांबवण्यासाठी फायद्याचे सिद्ध होतील. पुढे वाचा फायदे... नारळ केसांना पोषण देण्यात नारळ खूप उपयोगी आहे. नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज केल्याने पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात. तेल कमीत कमी एक तास तरी केसांमध्ये लावून ठेवावे. याव्यतिरिक्त नाराळाचे दूध केसांमध्ये लावून मसाज करून एक तासानंतर केस धुतल्याने फायदा होतो. जास्वंद जास्वंदाचे लाल फूल केसांसाठी वरदान आहे. हे पिसून नारळा...

घनदाट आणि चमकदार केसांसाठी 5 सोपे उपाय

Image
1.  केसांना धूळ, ऊन आणि प्रदूषणापासून वाचवा. यासाठी टोपी, स्कार्फ किंवा हेल्मेट वापरा.  रोज केस खुले सोडू नये. 2. आठवड्यातून दोनदा तरी तेलाची मालीश करावी ज्याने केसांना पोषण मिळेल. आणि केस धुण्याआधी मोकळे सोडावे. 3  दिवसभरात केसांना 3 वेळा विंचरा. कारण केसात गुंता झाल्यावर त्यांची तुटण्याची भीती असते. ज्याने केसांचा दाटपणा कमी होतो. पण ओले केस विंचरू नये. केसांना तुटण्यापासून वाचविण्यासाठी खालील बाजूपासून विंचरायला सुरू करा. 4.  केसांना केमिकल कलरिंग करणे नुकसान करेल. रंग केसांचे पोषण नष्ट करून त्यांना ड्राय करतात. परिणामस्वरूप केसांचा दाटपणा कमी होतो आणि चमकही जाते. वाटल्यास प्राकृतिक रंग वापरू शकता. 5. केसांना चमकदार आणि दाट ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या. नारळ, सोया, राजगिरा, डाळी संत्रं, व इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

चेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा

Image
आपण चेहर्‍यासाठी घरगुती पॅक तयार करत असाल तर त्यात लिंबू नक्की वापरत असाल. परंतू अनेकदा बघण्यात आले आहे की लिंबू वापरल्याने रॅशेज किंवा जळजळ सारख्या समस्या उद्भवतात. लिंबाची प्रकृती आम्लिक असल्यामुळे याने त्वचेवर विपरित परिणाम होतो. जर आपल्याला याने अॅलजी असेल तर लिंबू वापरणे टाळा.  अनेकदा चांगल्या परिणामासाठी लिंबाचा अधिक उपयोग केला जातो आणि परिणामस्वरूप त्वचेवर पांढरे डाग, किंवा सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा खाजही सुटायला लागते. लिंबात फोटोसिंथेसाइजिंग कंपाउंड असतात जे त्वचेला यूव्ही रेजप्रती संवेदनशील ठेवतात. ज्यामुळे चेहर्‍यावर पिग्मेंटेशन होऊ शकतं. यापेक्षा सकाळी एक कप पाण्यात लिंबू पिळून पिऊन घ्या. याने शरीर डिटॉक्सीफाय होऊन जातं.  लिंबू वापरण्यापूर्वी हे लक्षात असू द्या: आपल्याला लिंबू वापरण्यापूर्वी आपली त्वचा कसी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपली त्वचा ड्राय किंवा फ्लॅकी आहे तर लिंबू वापरणे टाळा. चेहर्‍यावर पुरळ, जखम असल्यास लिंबू वापरू नये, जळजळ होऊ शकते. लिंबाने त्वचा हाईड्रेड होते म्हणून हे फायदेशीर आहे परंतू वापरण्यापूर्वी चेहरा मॉइस्चर करून घ्य...

सौंदर्यवर्धना

Image
स्वयंपाकघरातील पदार्थापासून सौंदर्यवर्धनाचे उपचार सौंदर्याची काळजी घेणे हे प्रत्येक स्त्रीला मनापासून वाटत असते .  प्रथम मुलांची काळजी व नंतर घरातील इतर जणांची काळजी घेताना गृहिणी स्वत:लाच विसरतात . चाळीशी आली की त्वचा , डोळे , केस यांच्या विविध तक्रारी सुरु होतात .  ब्युटीपार्लर मध्ये वारंवार जाण्यासाठी वेळ व पैसा दोन्हींची कमतरता जाणवते . पण प्रत्येक गृहिणींच्या हे लक्षात येत नाही की , स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांचा सौंदर्यवर्धनासाठी खूप उपयोग होतो . स्वयंपाकघरातील पदार्थापासून स्वाद , गंध व शरीर-मनाची तृप्ती करणारे अन्नपदार्थ बनवले जातात .  पण आपल्या रूपासाठी वेगळा एकही पैसा खर्च ण करता उपचार होतात .  दुध , दही , तूप , मध , विविध भाज्या डाळी इ. पासून स्त्रियांना आपले सौंदर्य जोपासता येते . १)      सकाळी दुध तापविण्यापूर्वी तीन ते चार टेबल स्पून दुध वातीत काढावे .  ह्या दुधाने चेहरा , मान , गळा सर्व ठिकाणी चोळावे .  घरगुती क्लिन्झिंग होऊन त्वचा साफ होते .  या दुधात हळदीची चिमुट , ज्येष्ठमध , अनंतमूळ , चंदन , गुलाब , खस , म...

उन्हाळ्यात सौंदर्य जपेल कूल काकडी

Image
उन्हाळा सुरू झाला की आपण कूल- कूल वस्तूंकडे वळतो. त्यातीलच एक कूल फूड म्हणजे काकडी आरोग्यासाठी तर उत्तम आहेच पण याच्या सेवनाने त्वचा सतेज होते. काकडीत 90 टक्के पाणी आणि दहा टक्क्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पोषक तत्त्व आणि फॅफीक अॅसिडचा समावेश असतो. पाहू काकडीमुळे कसे फुलतं सौंदर्य: उन्हाळ्यात त्वचेची लाली किंवा जळजळ दूर करायची असल्यास काकडीचा कीस त्वचेवर लावायला हवा. याने खाज सुटणेही थांबतं. त्वचा कोरडी पडत असेल तर काकडीचा रस लावला. कोरडेपणा दूर होईल. उन्हाळ्यात चिपचिपमुळे कपडे अंगावर घासले जातात. अश्या ठिकाणी काकडीच्या रसात मध मिसळून लेप तयार करा. हे लेप वेदना होत असलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची मात्रा संतुलित राहावी म्हणून काकडीचे सेवन करावे. उन्हाळ्यात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते. टॅनिग तर होतेच त्वचेचा रंग बदलतो. अशात काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून त्या जागेवर मसाज केल्याने त्वचा उजळ होईल. काकडीच्या रसाने मसाज केल्याने त्वचेची लवचीकता टिकून राहते. काळी वर्तुळ दूर करण्यासाठी त्याजागी काकडीच्या चकत्या ठेवाव्यात.

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

Image
चेहऱ्यावर काळे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. निस्तेज चेहरा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते. गव्हाचा कोंडा गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो. तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे. एक चमचा मध, एक चमचा ...

झोपेने वाढते सौंदर्य

Image
सौंदर्यवृद्धीसाठी अनेकजण काही ना काही उपाय करीत असतात, मात्र बाह्य उपचारापेक्षा चांगली झोप, सकल खाणेपिणे, व्यायाम सारख्या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात हे अनेक लोक विसरतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप अत्यावश्यक आहे. एक- दोन रात्री जरी पुरेसी झोप झाली नाही तरी चेहर्‍यावर त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. याउलट चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो आणि तेजस्वी दिसतो, स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले. तिथे संशोधकांनी यासाठी काही विद्यार्थ्यांची पाहणी केली. त्यामध्ये स्त्री-पुरूष अशा दोन्हीचा समावेश होता. आधी या विद्यार्थ्यांना दोन रात्री चांगली व भरपूर झोप घेण्यास सांगितले व नंतर आठवडाभराने दोन दिवस केवळ चार तास झोपण्यास सांगितले. त्यावेळी त्यांची छायाचित्रेही टिपण्यात आली. ही छायाचित्रे 122 अनोळखी लोकांना दाखवून त्यांचे मत विचारण्यात आले. चांगली झोप झाल्यावर जी छायाचित्रे काढण्यात आली त्यालाच लोकांनी पसंती दिली.

उन्हाळ्यात सौंदर्य जपेल कूल काकडी

Image
उन्हाळा सुरू झाला की आपण कूल- कूल वस्तूंकडे वळतो. त्यातीलच एक कूल फूड म्हणजे काकडी आरोग्यासाठी तर उत्तम आहेच पण याच्या सेवनाने त्वचा सतेज होते. काकडीत 90 टक्के पाणी आणि दहा टक्क्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पोषक तत्त्व आणि फॅफीक अॅसिडचा समावेश असतो. पाहू काकडीमुळे कसे फुलतं सौंदर्य: उन्हाळ्यात त्वचेची लाली किंवा जळजळ दूर करायची असल्यास काकडीचा कीस त्वचेवर लावायला हवा. याने खाज सुटणेही थांबतं. त्वचा कोरडी पडत असेल तर काकडीचा रस लावला. कोरडेपणा दूर होईल. उन्हाळ्यात चिपचिपमुळे कपडे अंगावर घासले जातात. अश्या ठिकाणी काकडीच्या रसात मध मिसळून लेप तयार करा. हे लेप वेदना होत असलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची मात्रा संतुलित राहावी म्हणून काकडीचे सेवन करावे. उन्हाळ्यात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते. टॅनिग तर होतेच त्वचेचा रंग बदलतो. अशात काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून त्या जागेवर मसाज केल्याने त्वचा उजळ होईल. काकडीच्या रसाने मसाज केल्याने त्वचेची लवचीकता टिकून राहते. काळी वर्तुळ दूर करण्यासाठी त्याजागी काकडीच्या चकत्या ठेवाव्यात.

कसलेली आणि स्वच्छ स्कीनसाठी 8 नैसर्गिक उपाय

Image
अनेकदा चेहर्‍याची त्वचा लटकून जाते आणि चमकही नाहीशी होऊन जाते. अनियमित आहार, ऊन, वयाप्रमाणे आणि इतर काही निष्काळजीचा प्रभाव चेहर्‍यावर होत असतो. चेहर्‍याची त्वचा टाईट करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात उत्तम पर्याय ठरतात. येथे आम्ही 8 नैसर्गिक उपाय देत आहोत ज्याने आपल्या चेहर्‍याला पोषण मिळेल. कोरफड बर्न स्कीनवर कोरफड जादूप्रमाणे प्रभाव सोडतं. 15 मिनिट कोरफड जेल त्वचेवर घासल्याने प्रभाव दिसू लागतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय अमलात आणावा. मध मिसळून याचा प्रभाव वाढवता येईल. काकडी 30 मिनिटापर्यंत काकडीचा रस चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने डाग, सुरकुत्या आणि सूज कमी होण्यात मदत मिळेल. दालचिनी दालचिनी वापरल्याने चेहर्‍याचे तारुण्य कायम राहतं. परंतू नुसती दालचिनी वापरणे योग्य नाही. म्हणून हळद आणि दालचिनी पावडर सममात्रेत मिसळा. याची पेस्ट तयार करण्यासाठी जैतुनचे तेल वापरा. ही पेस्ट लावून वाळल्यावर धुऊन टाका. नंतर साखरेच्या दाण्यांनी 5 मिनिटापर्यंत चेहरा घासा. पुन्हा धुवा. आठवड्यातून दोनदा ही क्रिया अमलात आणा. खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा पाण्यात...

मॉन्सूनसाठी सौंदर्य टिप्स

Image
मेकअप :  या पावसाळी दिवसात मेकअप करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण तुम्ही पावसात थोडेही भिजलात तरी तुमचा मेकअप खराब होतो त्यासाठी फाउंडेशनच्या जागेवर फेस पावडरचा वापर करावा. डोळ्यांसाठी प्रयोगात येणारे लायनर किंवा मस्करा वॉटरप्रूफ असावा. असा मेकअप पावसात खराब होणार नाही. केस :  या मोसमाचा आनंद घेताना केसांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात केसांवर जेल वापरू नये. कारण या काळात डँड्रफ किंवा उवा होण्याची शक्यता जास्त असते. कोमट तेलाची मालीश करावी व केसांना दीर्घकाळ बांधून ठेवावी.