घरी डाय करत असाल तर घ्या ही काळजी...

* डाय किंवा हेअर कलरचा दर्जा आणि प्रमाण यांची सांगड घाला.

* केस शॉर्ट असतील तर एकाच वेळी पूर्ण पॅक न वापरता अर्धाच मिक्स करा. गरज असेल तरच पूर्ण पॅक वापरा. शिल्लक पॅक पुन्हा व्यवस्थित बंदिस्त करा.


* डाय करताना आधी स्कीन टेस्ट करा, अन्यथा रॅशमुळे चेहर्‍याची, कानामागची, त्वचा काळी पडू शकते.

* डाय लावताना ऑईल बेस निवडावा वा डाय धुतल्यानंतर ऑईल मसाज करावा. कारण डाय वा हेअर कलरमुळे केस, त्वचा कोरडी, रुक्ष होते, त्वचा ऑईल बेस कमी होतो. त्यामुळे नव्याने येणार्‍या केसांचे पोषण योग्य प्रमाणात होत नाही.

* डाय वा हेअर कलर वापरणार्‍यांनी परिपूर्ण आहार, झोप, पिण्याच्या पाण्याचे संतुलित प्रमाण ठेवावे म्हणजे. डायचा त्रास होणार नाही.

* डाय, कलर पॅकसोबत दिलेल्या सूचना अवश्य वाचा. जर रॅश, अॅलर्जी असे काही आढळले, तर त्वरित स्कीन स्पेशालिस्टकडे जा. घरगुती उपचार नकोत.

Comments

Popular posts from this blog

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

राईस पॅक लावा, टॅनिंग घालवा