डागरहित त्वचेसाठी मिठाचे फेशियल स्क्रब

डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे.

डागरहित त्वचेसाठी

एका बाउलमध्ये मिठात काही थेंब लिंबाचा रस टाकून हलक्या हाताने स्क्रब करा. याने पुरळ, मृत त्वचा, ब्लॅक आणि व्हाईट हेड दूर होतात. हे स्क्रब आठवड्यातून दोनदा प्रयोगात आणू शकता.

पिंपल्स दूर करण्यासाठी

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या तेलात मीठ टाकून स्क्रब करावे. याने पिंपल्स नाहीसे होतील. आपण बदामाचे तेलही वापरू शकता. पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसळून चेहर्‍यावर स्क्रब करावे.

टॅनिंग दूर करण्यासाठी

काळ्या मिठाचे स्क्रब चांगले परिणाम देतं. एका चमचा मधात थोडे मीठ मिसळून चेहर्‍यावर लावल्याने सन टॅनिंग दूर होईल.

स्क्रब करण्याचे नियम

स्क्रब केल्याने मृत त्वचा बाहेर पडते आणि ग्लो येतो. पण अधिक स्क्रब केल्याने त्वचेला नुकसानही होऊ शकतं. म्हणून रोज स्क्रब करू नये. आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रब करावे. स्क्रब नेहमी हलक्या हाताने करावे. स्क्रबिंग करण्यापूर्वी चेहरा धुऊन टाकावा. नंतर बोटांने

कपाळाहून

स्क्रब सुरू करत पूर्ण चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करावी. दोन मिनिट मसाज केल्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय