Posts

Showing posts from January, 2018

मुलतानी मातीचे फायदे

Image
सौंदर्य खुलावताना चेहऱ्याची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते आणि त्यात नैसर्गिक रित्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती हा एक महत्वाचा आणि चांगला पर्याय आहे . १)  मुलतानी माती लावल्यामुळे चेहर्‍यावरील डाग, सुरकुत्या तर नाहीसे होतातच शिवाय यामुळे काही दुष्परिणाम ही नाही होत . multani_mati२)  चेहर्‍यावर मुरूमे झाली असल्यास छोटा चमचा मुलतानी माती व बेसन पीठ, थोडीशी हळद पुड टाकून ही पेस्ट चेहर्‍याला आठवड्यातून दोन वेळा लावावा. ३)   मुलतानी मातीने  चेहरा स्वच्छ होतो आणि रंग ही उजळतो .  उन्हामध्ये काळवंडलेल्या चेहर्‍यावर मुलतानी माती लावल्यामुळे चेहरा उजळवून स्वच्छ होतो . 

सुंदर, नितळ, निरागस डोळ्यांची निगा अशी राखा..

Image
आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का? डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरीता काही महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे, १) डोळ्यांची निरोगी वाढ व्हावी आणि ते शेवटपर्यंत चांगले,  कार्यक्षम राहावे यासाठी ‘अ‘ जीवनसत्व असलेल्या हिरव्यापालेभाज्या, दूध, अंडी , मांस, मासे यांचा आहारात समावेश करावा. २) काजळ, सुरमामध्ये समाविष्ट केलेल्या रासायनिकपदार्थांमुळे डोळ्यांना इजा होवू शकते. त्यामुळे त्याचा वापरशक्यतो टाळावा. ३) भुवया व पापण्यांना आकार देण्यासाठी पेन्सिलीचा  वापर केला जातो. अशा सौदर्यप्रसाधनांच्या वापरामुळेडोळ्यांच्या नाजूक त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ४) मधुमेह, रक्तदाब आणि टी. बी. असलेल्या रुग्णांनीआपल्या डोळ्यांची दरमहा तपासणी करावी. ५) उन्हात जाताना, वाहन चालविताना अथवा कंपनीतीलकामगारांनी चष्मा अवश्य वापरावा.

चमकदार त्वचेसाठी रात्री लावावे ग्लिसरीन

Image
त्वचेच्या ओलाव्यासाठी आणि विशेषतः हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी रात्री त्वचेवर ब्युटी प्रॉडक्ट लावल्याने सकाळी चेहर्‍यावर वेगळाच ग्लो दिसून येतो. पण निश्चितच ते ब्युटी प्रॉडक्ट केमिकलयुक्त नसावे म्हणून ग्लिसरीन हे सर्वात योग्य प्रॉडक्ट आहे. रात्री चेहर्‍यावर ग्लिसरीन आणि लिंबू लावून झोपले तर चेहर्‍यावरील रुक्षपणा कमी होईल तसेच टाचांवर याचा प्रयोग फायदेशीर ठरेल. तर जाणून घ्या ग्लिसरीन लावण्याचे काय फायदे आहे ते: 1. फेअर आणि डाग दूर करण्यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचे रस, गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून लावावे. काही मिनिट याने मसाज करावी. आणि रात्रभर असेच राहू द्यावे. याने डाग दूर होतील तसेच त्वचा उजळेल. 2. ड्रायनेस कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दुधाच्या सायीत जरा से ग्लिसरीन मिसळून चेहर्‍यावर लावून 10 मिनिट तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे. 3. रात्री झोपण्यापूर्वी मॉइस्चरायझरप्रमाणे ग्लिसरीन वापरले जाऊ शकतं. आपल्या रोज वापरण्याच्या क्रीमसोबत ग्लिसरीन मिसळून लावता येईल. तसेच क्रीम वापरायची नसल्यास साध्या पाण्यात ग्लिसरीन मिसळून लाव...

सौंदर्यसाधना घरच्या घरी

Image
घरच्या घरीचेहरा अधिक तजेलदार राहावा आणि त्यात स्निग्धता असावी यासाठी स्त्रिया जागरूक असतात. हे साधण्यासाठी विविध उपचार गरजेचे ठरतात. त्यादृष्टीने आहारात प्रोटिन्स, व्हिटामिन-ए आणि सी यांनी युक्त पदार्थांचा समावेश असावा. रोज किमान आठ ग्लास पाणी आणि एक ग्लास गाजराचा रस घ्यावा. याबरोबरच मॉइश्‍चरायझरयुक्त क्रीमचाही वापर महत्त्वपूर्ण ठरतो. मॉइश्‍चरायझरयुक्त फाऊंडेशन क्रीम शुष्क त्वचेला चमकदार आणि सुंदर बनवते. हे मॉइश्‍चरायझर क्रीम घरीही बनवता येते. चार बदाम, दोन शेंगदाणे, दोन चारोळ्या, एक आक्रोड हे सर्व वाटून घ्यावे. त्यात चार छोटे चमचे साय, दोन छोटे चमचे काकडीचा रस, एक छोटा चमचा मध तसेच गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट तयार करावी. हे घरी बनवलेले मॉइश्‍चरायझर बाजारातील मॉइश्‍चरायझरपेक्षा अधिक दर्जेदार असते.

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ

Image
केस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय. अती तेल लावणे जर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात. केस रगडून धुणे शैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा. ओले केस विंचरणे ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा. केसांमध्ये हीटचा प्रयोग जर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल. ...

या 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स

Image
अंडरआर्म्स काळे पडणे सामान्य गोष्ट आहे. पण तरी हे काळे होत असावे यासाठी या पाच कारणांवर विचार केला पाहिजे: हेअर रिमूव्हल क्रीम:  हेअर रिमूव्हल क्रिममुळे अंडरआर्म्स काळे पडू शकतात. केस काढण्यासाठी आपण ही अशी क्रीम वापरत असाल तर ती लगेचच वापरणे बंद करावी. रेझर: केस काढण्यासाठी रेझर वापरणे सोपे असले तरी योग्य नाही. याने कडक केस येतात तसेच यामुळे त्वचा काळी पडते. डिओ:  काही केमिकल युक्त डिओ किंवा परफ्यूम वापरल्याने अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लागते. असे उत्पाद वापरणे टाळावे. मृत त्वचा: मृत त्वचा काळसरच असते, जी काळानंतर अजून काळी आणि कडक होऊ लागते. यापासून वाचण्यासाठी नियमित स्वच्छता आवश्यक आहे. घाम:  घामामुळे त्वचा काळी पडू लागते. आपल्याला अधिक घाम येत असल्यास अंडरआर्म्स काळे पडू लागतात. तर या पाच कारणांमुळे जर आपली त्वचा काळी पडत असेल तर हे प्रकार टाळावे आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी.

7 दिवसात स्वच्छ करा काळी मान

Image
उन्हाने गळ्यावर टेनिंग होऊन जाते ज्याने आपला चेहरा जरी गोरा दिसतं असेल तरी मान काळीच दिसते. बेकिंग सोड्याच्या मदतीने मान स्वच्छ केली जाऊ शकते. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. कशी तयार कराल ही पेस्ट: -> एका बाऊलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. -> आता या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. नारळाच्या तेलाने घाण निघून जाते आणि पोर्स स्वच्छ होतात. -> आता एका नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या आणि 2 मिनिट तसेच राहू द्या. टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने पोर्स खुलतील. -> आता पॅक लावण्यापूर्वी आधी पेच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसल्यास मानेवर लावा. -> या पॅकची हलकी लेयर मानेवर लावा. 15 मिनिट तसेच राहू द्या. वाळू लागल्यावर पाण्याच्या मदतीने...

सौंदर्य वाढविण्यासाठी उशी न घेता झोपावे

Image
डोक्याखाली उशी घेऊन झोपणे अगदी सामान्य आहे. अनेक लोकांना उशीविना झोप येत नाही. परंतू विशेषज्ञांप्रमाणे उशीविना झोपणे अधिक फायदेशीर आहे याने शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी झोप येते. उशी ने घेता झोपण्याने आरोग्य तर उत्तम राहताच सौंदर्य वाढविण्यासाठी हे योग्य आहे. पिंपल्सपासून मुक्ती उशीविना झोपल्याने चेहर्‍यावर पिंपल्स येण्याची शक्यता नाहीशी होते. कारण उशी वापरल्याने त्यावर जमा असलेल्या धुळीमुळे पिंपल्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरकुत्या येत नाही उशी वापरल्याने चेहर्‍यावर दबाव पडत असतो ज्याने वयापूर्वी सुरकुत्या येतात. तारुण्य वाढतं उशी घेऊन झोपल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरदेखील थकवा जाणवतो परंतू उशी न वापरल्याने तणावरहित झोप लागते ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते आणि आपण नेहमी तरुण दिसतात. ग्लो वाढतो ज्यांना झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी उशी घेतल्याविना झोपावे ज्याने शांत झोप लागते आणि रिलॅक्स जाणवतं. शरीर रिलॅक्स असल्यास चेहर्‍यावरील ग्लो आपोआप वाढतो.

केसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स

Image
* केसांना मेजेंटा रंग द्याचा असेल तर मेंदी जास्वंदीचे फूल पिसून टाका. * हिवाळ्यात मेंदी लावताना त्यात काही लवंगा पिसून टाका. सर्दीपासून बचाव होईल. * सर्दीचा त्रास असल्यास मेंदीत तेल, चहा किंवा कॉफी मिसळा. आवळा चूर्ण, बीट ज्यूस, दालचिनी, अक्रोड असे पदार्थही मिसळू शकता. * ग्रे हेअर्सपासून बचावासाठी मेंदीत एक कापूर आणि एक चमचा मेथी पावडर मिसळा. दोन चमचे संतर्‍याच्या रसात दोन चमचे मेंदी पावडर मिसळा आणि शेपूंनंतर केसांना लावून दहा मिनिटाने धुऊन टाका. * केसांना रंगवायचे असेल तर मेंदी दोन चमचे चहाचं पाणी मिसळा.> * खूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून दोन तीन दिवसात केसांच्या मुळाला लावा. केस गळणे कमी होईल.

अॅलर्जी असणार्‍या त्वचेसाठी मेकअप

Image
त्वचा संवेदनशील असेल तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. कोणतंही मेक अप प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याचं त्वचेवर परीक्षण करणं गरजेचं ठरतं. अॅलर्जीमुळे अनेक मेक अप प्रॉडक्ट वापरणं अवघड होऊन बसतं. अॅ‍लर्जिक त्वचेचा मेक अप कसा करावा याविषयी... * अॅलर्जिक त्वचा असणार्‍या व्यक्तींनी मेक अपची सुरुवात क्लिंजिंग आणि मॉईश्चरायझिंगने करावी. त्यानंतर फाउंडेशनचा अत्यंत पातळ थर लावून घ्यावा. * नंतर चीकबोन्सच्या थोडं खाली, नाकाच्या दोन्ही बाजूला आणि कपाळाच्या बाजूंना ब्रोंजर लावा. नाकला अधिक उठाव येण्यासाठी काँट्युर मेक अप करा. * अॅलर्जिक त्वचा असणार्‍यांनी डोळ्यासाठी मेक अपची उत्पादनं खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. * टिश्यू आणि मेक अप ब्रशचा वापर टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्याऐवजी सुती रुमालाचा वापर करावा. * अँलर्जीमध्ये डोळ्याखालच्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंडर आय क्रीम लावावं. * कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेसाठी कितपत उपयोग ठरेल याची माहिती घ्या. * अॅलर्जिक स्कीन असणार्‍यांनी शक्यतो स्वत:चे मेक अप प्रॉडक्ट इत...

'चिकबोन'ला सुंदर बनवण्यासाठी काही उपाय!

Image
आम्ही सर्व इतके भाग्यवान नसतो की जन्मापासूनच आमचे चिकबोंस सुंदर असतात, पण जर काही उपाय केले तर त्यांना सुंदर बनवू शकतो. चेहऱ्यावर ब्लशरचा वापर करून त्यांच्यात उभार आणू शकतो. जे शेड योग्य असेल त्याचाच वापर केला पाहिजे. जास्त डार्क किंवा जास्त लाइट शेड वापरणे टाळावे. हे नेहमी मीडियम शेडचे असले पाहिजे. ज्यांची त्वचा पेल असते, त्यांनी ब्रॉंजर वापरायला पाहिजे पण त्यासाठी फक्त शेड सिलेक्ट करून चालणार नाही, त्याला व्यवस्थितरीत्या लावतासुद्धा यायला पाहिजे. चिक्सच्या शेवटी आणि डोळ्यांच्या सुरवातीला शिमरी ब्लशचा वापर करावा. याने चेहरा हायलाइट होईल आणि चिक बोंस उभारून दिसतील. तुमच्या चिकचा गोल भाग अ‍ॅपल म्हणून ओळखण्यात येतो, यावर ब्रश व्यवस्थित लावायला पाहिजे. मेकअप प्रॉडक्ट कुठे जास्त किंवा कुठे कमी नाही लावायला पाहिजे. ते एकसारखे असणे गरजेचे आहे. जो पर्यंत शक्य असेल त्याला नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तुमच्या त्वचेला उत्सवी तेज कसे प्रदान करावे

Image
प्रत्येक स्त्री नेहमीच तिच्या सौंदर्याला तेजाचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करत असते. काही स्त्रिया कपड्यांच्या रंगसंगतीने तर इतर त्यांच्या सौंदर्यविषयक पथ्याने असे करतात. ते बरोबरच आहे! सामान्य दिवशीही, तुमच्या त्वचेला निरोगी अनुभूतीची आणि चमकदार दिसण्याचा हक्क आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही चमक मिळवण्याचा विचार करत असाल, तर चमकदार त्वचेसाठीच्या या टिप्सवर विश्वास ठेवा ज्या तुम्हांला नवतेज प्रदान करतील..... त्वचा धुवून घ्या जर तुम्हांला तेजस्वी त्वचा हवी असेल, तर तुमचा प्रवास योग्य फेसवॉशने सुरू व्हायला हवा. त्यासाठी, आम्ही तुम्हांला लॅकमे ब्लश ॲन्ड ग्लो स्ट्रॉबेरी फेसवॉशची शिफारस करतो. जो स्ट्रॉबेरीच्या अर्कांनी आणि क्लिंजिंग बिड्सनी बनला आहे, हे उत्पादन कोणत्याही प्रकारची अशुद्धता आणि घाण काढून टाकून तुमच्या त्वचेला आकर्षक लाली देण्याकरिता अगदी सुयोग्य आहे. सजल (हायड्रेटेड) रहा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काय टाकता याचे प्रतिबिंब तुमची त्वचा दर्शवत असते त्यामुळे त्वचेच्या नितळ प्रतिबिंबासाठी, तुम्ही तुमची त्वचा सजल ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या त्वचेमध्ये पूर्णतः फरक झालेला पाहता ...

राईस पॅक लावा, टॅनिंग घालवा

Image
ऋतू कोणताही असला तरी टॅनिंगचा धोका असतोच. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे त्वता टॅन होतो, अकाली सुरकुत्या पडतात. यावर उपाय म्हणून घरगुती फेस मास्क बनवता येईल. साहित्य :  अर्धी वाटी शिजवलेला भात, तीन छोटे चमचे हळद पावडर, दोन चमचे मीठ, एक चमचा दही, एक चमचा मध. कृती :  एका बाऊलमध्ये शिजवलेला भात घ्या. त्यात एक चमचा मध घाला. भातात हळद पावडर, मीठ आणि दही मिसळून मिश्रण एकजीव करा. पॅक लावताना हे पेस्ट स्वरूपातलं मिश्रण चेहरा आणि मानेवर लेपस्वरूपात लावा. या मिश्रणाचा जाड थर लागायला हवा. साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांनंतर लेप पूर्णपणे सुकेल. त्यानंतर गरम पाण्याने रगडून लेप काढून टाका. आठवड्यातून चार वेळा हा लेप लावल्यास टॅनिंगपासून मुक्ती मिळेल. तांदळात चांगल्या मात्रेत अॅण्टिऑक्सिडंट तत्त्वं असतात. या गुणधर्मामुळे त्वचेतील कोलाजेनची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. या पॅकमध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळदीमधील गुणतत्त्वांमुळे त्वचेवरील घातक जीवाणू आणि विषाणूंचा बंदोबस्त होतो. सहाजिकच त्यामुळे त्वचासंसर्ग कमी होण्यास मदत होते. चेहर्‍यावरील मुरूमांचे डाग, डोळ्य...

मुरुमांवर घरगुती उपाय

Image
मुरूम / Pimples सामान्यपणे कधीही कुणाही मानसाला येऊ शकतात. मुरूम त्वचेची जळ जळ आणि सुजन यामुळे होतात. ज्यामध्ये त्वचेवर तेलाची मात्रा सुद्धा वाढत जाते आणि त्वचेवर सुज येऊ लागते. त्वचेत तेलाचा स्त्राव जास्त झाल्यामुळे सुद्धा मुरुमाची समस्या होते. मुरूम साधारणपणे चेहरा, गळा, पाठ आणि खांद्यावर येतात. हे काही गंभीर समस्या नाही परंतु मुरूम माणसाला खूप त्रास देतात. मुरुमांना ठीक करण्यासाठी बाज़ारात खूप लोशन आणि औषधे उपलब्ध आहेत परंतु यामध्ये मुरुमांना / Acne दूर करण्यासाठी खूप वेळ लागतो.यापेक्षा तुम्ही काही नैसर्गिक उपाय अवलंबून कमीत कमी वेळात मुरुमांपासून मुक्तता मिळवू शकता. मुरुमांपासून मुक्तता मिळविण्यासाठी 10 सोपे उपाय खाली दिलेले आहेत – आइस (बर्फ) – बर्फाचा उपयोग कमीत कमी वेळामध्ये त्वचेचे लालसरपण, सुजन आणि मुरूम कमी करण्यासाठी करू शकता. बर्फ प्रभावित जागेवर रक्त प्रवाहास विकसित करतो आणि त्वचेच्या गड्ड्यानाही भरून काढतो. आणि चेहऱ्यावरून धूळ आणि तेल हटवून चेहऱ्याला साफ़ करतो. तुम्ही बर्फाचे टुकडे किंवा बर्फ किसून हि उपयोग करु शकता. 1. बर्फाच्या तुकड्यांना एका कपड्यामध्ये लप...

बियरचा वापर केल्याने केस होतात सिल्की & शाईनं

Image
सुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भार टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. सर्वांनाच आपल्या केसांना शाइनी आणि सिल्की ठेवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारांच्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागतो, पण या प्रॉडक्ट्समुळे केसांना नुकसान होण्याची भिती सदैव असते. म्हणून घरगुती कंडिशनरचं केसांसाठी उत्तम असतात. म्हणून जाणून घेऊ असे काही घरगुती कंडिशनर्सबद्दल ... 1. एक कप बियरला एखाद्या भांड्यात तोपर्यंत गरम करा जो पर्यंत त्याचे प्रमाण अर्धे राहत नाही. गरम केल्याने बियरमधील अल्कोहल वाफ बनून उडून जाते. आता याला गार होऊ द्या, नंतर यात आपल्या पसंतीचा शँपू मिसळून द्या, लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ज्या शँम्पूचा वापर करत असाल तो एकाच ब्रँडचा असायला पाहिजे. या घोळला एका बाटलीत भरून ठेवा. जेव्हा कधी केस धुवायचे असतील याने केस धुआ, यामुळे राठ केसांमध्ये देखील निखर येईल. केस चमकदार आणि सुंदर दिसतील. 2. केळी केसांसाठी फारच उत्तम मानण्यात आले आहे. केळींची पेस्ट तयार करून त्यात काही थेंब मधाचे टाकून ही पेस्ट 30 मिनिटापर्यंत केसांवर लावून ठेवावे. नंतर गार पाण्याने केस धुऊन टाकावे. 3. आपल्या केसांना...

रोज वापरू नये हे मेकअप प्रॉडक्ट्स

Image
मेकअप ही प्रत्येक स्त्रीची आवड असते. त्यातून आवडतं ब्रँड, कलर, आणि परर्फेक्ट मेकअप किट हाती लागून गेली तर दररोज मेकअप करण्याची सवयच पडू लागते. मग चेहरा, डोळे, केस त्या प्रॉडक्ट्सविना बघायला आवडत नाही मग याने नैसर्गिकपणे त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होऊ लागतो. काही मेकअप प्रॉडक्ट्स असे असतात जे दररोज वापरू नये. तर बघून घ्या असे कोणते प्रॉडक्ट्स आहे जे वापरल्याने आपल्या त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो: ड्राय शांपू केस धुवायला वेळ नसल्यास लोकं ड्राय शांपू वापरतात. परंतू याच्या अतिवापरामुळे केस रुक्ष आणि कमजोर होऊ लागतात. केस तुटू लागतात आणि त्यांची गुणवत्ताही घटते. डिप कंडिशनर डिप कंडिशनर दिल्यावर केस सुंदर दिसतात परंतू याचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतं आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं. हा प्रॉडक्ट दररोज वापरणे योग्य नाही. मेडिकेटेड लिप बाम फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरलं जातं. पण निरंतर हे वापरल्याने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते. मेकअप प्रायमर मेकअप करण्यार्‍यांना हा प्रॉडक...

मुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी .

Image
सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे .  नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपावे .  कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे .  face-mask-for-oily-skinतेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम होईल .  मुरुमावर औषधी क्रीम लावावे .  लवंग व मिरी तेलाचे थेंब असलेले कॅलमाईन मुरुमावर लावावे . दुपारी परत चेहरा सध्या पाण्याने धुऊन Astrinjunt लावून मग क्रीम लावावे . रात्री सकाळी केल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ धुऊन क्लेंझर , Astrinjunt लावावे .  मग क्लीअरसिलसारखे औषध लावावे .  मॉइश्चरायझरही लावता येईल .  मुरुमे असल्यास ती कमी करण्यासाठी पुढील कृती करावी . १)      मुरुमांना खूप हाताळू नये . २)     ऑईल बेस क्रीम लावू नये . ३)     खूप तळण वगैरे तळू नये , कारण उडणारे तेल व धूर त्वचेसाठी योग्य नाही . ४)     ताणरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा .