अॅलर्जी असणार्‍या त्वचेसाठी मेकअप

त्वचा संवेदनशील असेल तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. कोणतंही मेक अप प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याचं त्वचेवर परीक्षण करणं गरजेचं ठरतं. अॅलर्जीमुळे अनेक मेक अप प्रॉडक्ट वापरणं अवघड होऊन बसतं. अॅ‍लर्जिक त्वचेचा मेक अप कसा करावा याविषयी...

* अॅलर्जिक त्वचा असणार्‍या व्यक्तींनी मेक अपची सुरुवात क्लिंजिंग आणि मॉईश्चरायझिंगने करावी. त्यानंतर फाउंडेशनचा अत्यंत पातळ थर लावून घ्यावा.

* नंतर चीकबोन्सच्या थोडं खाली, नाकाच्या दोन्ही बाजूला आणि कपाळाच्या बाजूंना ब्रोंजर लावा. नाकला अधिक उठाव येण्यासाठी काँट्युर मेक अप करा.

* अॅलर्जिक त्वचा असणार्‍यांनी डोळ्यासाठी मेक अपची उत्पादनं खरेदी करताना सावधगिरी बाळगावी.

* टिश्यू आणि मेक अप ब्रशचा वापर टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्याऐवजी सुती रुमालाचा वापर करावा.

* अँलर्जीमध्ये डोळ्याखालच्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंडर आय क्रीम लावावं.

* कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेसाठी कितपत उपयोग ठरेल याची माहिती घ्या.
* अॅलर्जिक स्कीन असणार्‍यांनी शक्यतो स्वत:चे मेक अप प्रॉडक्ट इतरांबरोबर शेअर करू नयेत.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय