1 आठवड्यात गोरेपणा मिळवण्यासाठी वाचा या 5 टिपा

उजळ रंग कुणाला आवडत नाही, अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग डार्क होत जातो आणि सुंदर त्वचा त्या डार्क त्वचेखाली लपून जाते. पण याहून मुक्ती मिळू शकते. मात्र एका आठवड्यात आपला उजळ रंग पुन्हा दिसू शकतो. जाणून घ्या यासाठी 5 टिपा: 

1 लिंबू- 

लिंबू आपला रंग हलका करण्यासाठी व त्वचेला आतापर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतं. हे आपल्याला त्वचेवरील डाग मिटवण्यास मदत करतं. लिंबाचा रस बेसन किंवा काकडीबरोबर मिसळून त्वचेवर लावावे.

2. हळद- 

हळद हिवाळ्यात नैसर्गिक रूपाने त्वचा उजळवण्यात मदत करते. हळद कच्च्या दुधात मिसळून चेहर्‍यावर लावल्याने काही दिवसातच आपल्याला उजळ त्वचा दिसू लागेल.

3. बेसन-

 बेसन नॅचरल आणि प्रभावी फेसपॅकच्या रूपात वापरलं जाऊ शकतं. त्वचेप्रमाणे यात दूध किंवा दही आणि जराशी हळद मिसळून वापरावे. वाटल्यास लिंबू किंवा टोमॅटोचं रसही मिसळू शकता.

4. चंदन पावडर- 

चंदन पावडर किंवा चंदन घासून तयार केलेले पेस्ट, हे आपली त्वचा उजळ करण्यात मदत करेल. याने डागरहित उजळ त्वचा मिळू शकेल.

5. चारोळी- 

चारोळी दुधात घासून फेसपॅक तयार करावा. गोरा वर्ण प्राप्त करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. वाटल्यास यात गुलाबाची पानेही मिसळू शकता.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय