हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय


हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो.


हळद आणि दही: 


1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.

हळद आणि काकडीचा रस: 


हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा