गुलाबजल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? हेच गुलाबजल जेवढं त्वचेसाठी लाभदायक ठरतं, तेवढचं ते केसांसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त त्वचेवरच नाहीतर, केसांवरही गुलाबजल लावा आणि मग बघा कमाल. जाणून घेऊया केसांना गुलाबजल लावल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत... आपल्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये अनेकदा आपल्याकडे केसांना तेल लावण्यासाठीही वेळ नसतो. यामुळे आपले केस कोरडे आणि निस्तेज होऊन केसांवरील चमक नाहीशी होते. अशा परिस्थितीमध्ये गुलाबजल अत्यंत फायदेशीर ठरतं. आपल्या केसांच्या लेन्थप्रमाणे गुलाबजल एका बाउलमध्ये घ्या. रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांसोबतच संपूर्ण केसांना तेलाप्रमाणे लावा. सकाळी उठल्यानंतर फक्त शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या, केसांचा कोरडेपणा दूर होऊन चमकदार होण्यासही मदत होईल. जर तुमचे केस शॅम्पू केल्यानंतर काही तासांनंतरही चिपचिपीत दिसत असतील तर त्यासाठी तुम्ही गुलाबजलाचा वापर करू शकता. त्यासाठी 3 चमचे गुलाबजल. एक चमचा मध आणि अर्ध लिंबू एकत्र करून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण शॅम्पू करण्याआधी एक तास...
Comments
Post a Comment