Posts

Showing posts from August, 2018

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ

Image
केस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय. अती तेल लावणे जर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात. केस रगडून धुणे शैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा. ओले केस विंचरणे ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा. केसांमध्ये हीटचा प्रयोग जर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल. ...

नॅचरल मॉइश्चयरायजर

Image
पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही.. काळजी का करता.. तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनविणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्वचेची सुंदरता आणि कोमलता कायम राखण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या नॅचरल मॉइश्चिरायजरचं काम करतात. मध:  त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध.. मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही. यामुळे चेहरा, हातापायाची चमक कायम राहते. ताक:  ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही एव्हरयंग दिसते. एक सुती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १0 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय

Image
हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो. हळद आणि दही:  1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील. हळद आणि काकडीचा रस:  हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.