डार्क सर्कल दूर करण्यासाठी मधाचे 5 उपाय

डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणं आहेत, जसे योग्य डाइट न घेणे, शरीरात पोषक तत्त्वांची कमी, कमजोरी, झोप पूर्ण न होणे आणि इतर. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊनही डार्क सर्कल्स जात नसतील तर काही घरगुती उपायाने हे दूर केले जाऊ शकतात.
मधात नैसर्गिक रूपात ब्लिचिंग गुण आढळतात ज्याने सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यात मदत मिळते. याच्या अॅटीऑक्सीडेंट प्रकृतीमुळे डार्क सर्कलवर हे खूप प्रभावी ठरतं. जाणून घ्या कश्या प्रकारे हे डार्क सर्कल्स दूर करण्यात मदत करतं ते:

शुद्ध मध: 

डार्क सर्कल्स वर मधाची एक पातळ लेअर लावा आणि 20 मिनिटापर्यंत हळूवार
मालीश करा. नंतर पाण्याने धुऊन टाका.
मध, व्हि‍टॅमिन इ आणि अंड्यातील पांढरा भाग: व्हिटॅमिन इ कॅप्सूल वाटून त्यात मध आणि अंड्यातील पांढरा भाग मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली लावा. वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका.

मध आणि बदाम:

 सम प्रमाणात मध आणि बदामाचे तेल मिसळा. हे डोळ्या जवळच्या भागाला लावून हलक्या हाताने मालीश करा. रात्री असेच राहून द्या. सकाळी उठून घुऊन टाका.

मध आणि केळ:

 एका बाऊलमध्ये मध आणि तेवढ्या प्रमाणात केळ मिसळा. डार्क सर्कल्सवर लावून एका तासासाठी तसेच राहून द्या. हवं तर यात अंड्याचा पांढरा भागही सम प्रमाणात मिसळू शकता.

मध आणि दूध:

 1 चमचा कोमट दुधात मध मिसळा आणि हे मिश्रण डार्क सर्कलवर लावा. 20 मिनिटाने पाण्याने धुऊन टाका आणि हलक्या हाताने मुलायम टॉवेलने पुसून घ्या.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय