भुवयांमधील कोंड्यावर उपाय .
कोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा जास्त त्रासदायक आहे. भुवयात कोंडा झाला तर डोळे खाजणे, जळजळणे हा त्रास होतो. म्हणूनच हा त्रास असल्यास स्वच्छतेकडे लक्ष पुरवायला हवं. हा कोंडा घालवण्यासाठी रोजमेरीचं तेल गुणकारी आहे. यात जीवाणुरोधी गुण असतात. त्यामुळे संसर्ग टळतो आणि कोंडा नाहीसा होतो. या तेलानं भुवयांवर मसाज केल्यास कोंडा नाहीसा होतो. कोंड्याचा त्रास असेल, तर भुवयांवर काबुली चण्यांची पेस्ट लावावी. यातील ब जीवनसत्त्व आणि जिंकमुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. मेथीच्या पेस्टचा लेप लावल्यासही भुवयांतला कोंडा कमी होतो. भुवयांवर लिंबाचा ताजा रस लावल्यानं कोंडा कमी होतो. आहारामध्ये तळकट पदार्थ टाळून कोंड्यावर उपाय होऊ शकतो.

Comments
Post a Comment