तुमच्या त्वचेला उत्सवी तेज कसे प्रदान करावे

प्रत्येक स्त्री नेहमीच तिच्या सौंदर्याला तेजाचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करत असते. काही स्त्रिया कपड्यांच्या रंगसंगतीने तर इतर त्यांच्या सौंदर्यविषयक पथ्याने असे करतात. ते बरोबरच आहे! सामान्य दिवशीही, तुमच्या त्वचेला निरोगी अनुभूतीची आणि चमकदार दिसण्याचा हक्क आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही चमक मिळवण्याचा विचार करत असाल, तर चमकदार त्वचेसाठीच्या या टिप्सवर विश्वास ठेवा ज्या तुम्हांला नवतेज प्रदान करतील.....

त्वचा धुवून घ्या

जर तुम्हांला तेजस्वी त्वचा हवी असेल, तर तुमचा प्रवास योग्य फेसवॉशने सुरू व्हायला हवा. त्यासाठी, आम्ही तुम्हांला लॅकमे ब्लश ॲन्ड ग्लो स्ट्रॉबेरी फेसवॉशची शिफारस करतो. जो स्ट्रॉबेरीच्या अर्कांनी आणि क्लिंजिंग बिड्सनी बनला आहे, हे उत्पादन कोणत्याही प्रकारची अशुद्धता आणि घाण काढून टाकून तुमच्या त्वचेला आकर्षक लाली देण्याकरिता अगदी सुयोग्य आहे.

सजल (हायड्रेटेड) रहा

तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काय टाकता याचे प्रतिबिंब तुमची त्वचा दर्शवत असते त्यामुळे त्वचेच्या नितळ प्रतिबिंबासाठी, तुम्ही तुमची त्वचा सजल ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या त्वचेमध्ये पूर्णतः फरक झालेला पाहता यावा साठी तुमच्या आहारामध्ये आरोग्यकारक स्मूदीज आणि सजलीकरण करणार्या फळांचा समावेश करा. त्याचबरोबर, तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा आणि दिवसाला 2 ते 2.5 लिटर दरम्यान पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

चेहर्याला तेजस्वी करा

तुमच्या त्वचेला सुरेख तेज प्रदान करण्यासाठी, तिला फेअर ॲन्ड लव्हली आयुर्वेदिक केअर फेस क्रीमचा डोस द्या. याच्या आयुर्वेदिक फॉर्म्युल्यामध्ये केशर, व्हीट जर्म ऑईल आणि 16 इतर घटकांसह कुमकुमादी तैलम समाविष्ट आहे. ही तुम्हांला नैसर्गिक गोरेपणा देण्यासाठी, तुमच्या त्वचेचा पोत एकसमान करून तुमच्या चेहर्याला सोन्यासारखी चमक देण्याकरिता तुमच्या त्वचेची आयुर्वेदिक पद्धतीने निगा राखते.

वर्कआउट करा

जिममध्ये वजनी व्यायाम असो किंवा पार्कमध्ये पळणे असो किंवा टेरेसवर योगा करणे असो, अशा माध्यमातून वर्कआउटसाठी वेळ काढा. व्यायामामुळे तुमची हृदय स्पदंने आणि रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचेकडे ऑक्सिजनचे आणि महत्त्वाच्या पोषकद्रव्यांचे वहन होते आणि टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे, जेवढे अधिक तुमचे हृदय पंप करेल, तेवढी तुमची त्वचा चमदार होण्याची शक्यता अधिक असते!

तुमच्या त्वचेचे लाड पुरवा

धावपळीच्या दिवसांदरम्यान, तुमच्या त्वचेलाही या सर्वांमधून जावे लागत असते. म्हणून व्हॅसलिन इंटेन्सिव्ह केअर कोको ग्लो लोशननने तिचे लाड पुरवायला काहीच हरकत नाही. याच्या आकर्षक फॉर्म्युल्यामध्ये शुद्ध कोको बटर आणि स्ट्रॅटीजचे 3 मल्टी-लेअर मॉइश्चर समाविष्ट आहे जो आतून तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक उघड करतो आणि तिला पोषण देतो.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय