कोरडी त्वचा

तुमच्या त्वचेला कमी वेळा साफ करा.

कोरडी त्वचा अधिक कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी, दिवसातून एकदाच (जास्तीत जास्त दोनदा) साफ करणे गरजेचे असते.
तुमची त्वचा आर्द्र ठेवा
दिवसा तुम्ही असे डेटाइमसाठी असणारे मोइस्चराईजर वापरा ज्यामध्ये सनस्क्रीन आधीच समाविष्ट असेल.
रात्री, रात्रीसाठी असणारे मोइस्चराईजर लावा. तुमचे रात्रीसाठी असणारे मोइस्चराईजर कमीत कमी दोन तास तरी राहू द्या, नंतरच कोमट पाण्याने धुवा.
नेहमी लक्षात असू द्या की मेकअप लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेला मोइस्चराईजर शोषण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.
सनस्क्रीनचा वापर करा.
सनस्क्रीन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गरजेचे आहे कारण ते त्वचेवरील म्हातारपणाचे परिणाम कमी करते पण कोरड्या त्वचेसाठी अतिशय महत्वाचे आहे कारण कोरडी त्वचा लवकर वृद्ध होते. खात्री करून घ्या की, तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीन मध्ये नेहमी शिफारस केल्याप्रमाणे SPF15 च्या ऐवजी SPF30 किंवा जास्त प्रमाणात आहे.

कोरड्या त्वचेसाठी नेहमी योग्य उत्पादनांचा वापर करा.

त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ज्यामध्ये नैसर्गिक घटक जसे की, घाण्याचे खोबरेल तेल, कोको बटर आणि जीवनसत्व अ, ड आणि इ आहेत, कोरड्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात. कोरड्या त्वचेसाठी खात्रीपूर्वक मद्यार्क नसलेले टोनर जसे की गुलाबपाणीच वापरा. कधीही पेट्रोलियमवर आधारित किंवा खनिज तेल असलेली त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरू नका.

जास्त वेळ आंघोळ करू नका.

बहुतेक त्वचारोगतज्ञ सुचवतात की तुमची त्वचा कोरडी असेल तर ३-४ मिनिटेच आंघोळ करा. सौम्य साबण वापरा आणि रोज साबण वापरणे टाळावे. जोराने चोळणे सुद्धा चांगले नाही कारण त्यामुळे कोरड्या त्वचेला अधिकच त्रास होतो.

सकस आहार

आहारामध्ये जास्त अंटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व अ, ब, क आणि इ असलेल्या अन्नाचा समावेश करा. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ सारखे चांगले मेद जास्त प्रमाणात घ्या जे तुमच्या त्वचेला जास्त तेल निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. मद्य, कोला किंवा कॉफी टाळा कारण ते तुमची त्वचा शुष्क करतात.

खाजवू नका

कोरडी त्वचा एखाद्या ठिकाणी सतत खाजवली तर इसब किंवा त्वचेचे इतर संसर्ग होण्याची शक्यता असते. खाज शमविण्यासाठी खोबरेल तेल लावणे उत्तम.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय