Ten Best Marathi beauty Tips

1) चेहरयावरील सुरकुत्या घालविण्यासाठी


तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याच्या रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे.
या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.



2) उन्हापासून त्वचा सांभाळा


उष्णतेमुळे ओठ, तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉयश्चरायझिंग क्रीम लावून हळूवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.



3) चेहरा उजळण्यासाठी


एक चमचा टोमॅटोचा गर, चिमूटभर हळद. अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍याला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.





4) कोंडा घालविण्यासाठी

केसातील कोंडा फार सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्याघरी औषध तयार करता येईल





5) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी

आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.



7) केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी


केस धुतल्यावरही तेलकटपणा कमी न झाल्यास तीन लहान चमचे लिंबाचा रस केस धुऊन झाल्यावर लावा. आठवड्यातून दोनदा या प्रमाणात हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल.





8)ओठ फाटल्यास त्यावर शुद्ध तुप लावा


ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा.





9) उन्हाळ्यातील कपडे


उन्हाळ्यात घाम जास्त येतो म्हणून या काळात सुती कपडे वापरावे. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.





10) उन्हापासून त्वचा सांभाळा


कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल तर कच्च्या टोमॅटोला कुस्करून त्यात ताक मिसळून चेहर्‍याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. दररोज अंघोळीच्या आधी शरीराच्या उघड्या भागाला दही लावून 10 मिनिटापर्यंत तसेच राहू द्या. मग अंघोळ करा.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय