हे जाणून घेतल्यावर लगेच लावाल केसांना दही

आरोग्यासाठी दही खाणे उत्तम आहे हे तर सर्वांच माहीत आहे पण दह्याने त्वचा आणि केसांचेही सौंदर्य वाढतं हे कमी लोकांच माहीत असेल. नियमित दही लावल्याने चेहर्‍यावर ग्लो येतो आणि केसांवर वापरल्याने डेड्रफ दूर होतं आणि केसही मजबूत होतात. तर आता साबण आणि शैंपूवर खर्च करणे सोडून दही लावा आणि जाणून घ्या किती गुणकारी आहे हे ते:

केसांसाठी कंडिशनर

हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करतं. पूर्ण केसांवर दही लावून शॉवर कॅप लावून घ्या. 30 मिनिटाने केस धुऊन टाका.

केस होतील मुलायम

दह्याला मधात मिसळून मास्क तयार करा. हे केसांना लावल्याने केस मुलायम होती. हे 15 ते 20 मिनिटापर्यंत केसांना लावून ठेवावे नंतर धुऊन घ्यावे.

केसांमध्ये चमकसाठी

केसांना मॉइस्जराइज करून चमक आण्याची असेल तर दह्याला मायोनीजबरोबर मिसळावे. हे मिश्रण केसांच्या शेवटल्या कोपर्‍यापर्यंत लावावे. अर्ध्या तासाने केस सामान्य पाण्याने धुऊन टाकावे.

दोन तोंडी केसांपासून मुक्ती

आठवड्यातून दोन दिवस केसांमध्ये दही लावा, आपली दोन तोंड असलेल्या केसांची समस्या सुटेल. केस मजबूत होतील.

कोंड्यापासून सुटका

कोंड्याची समस्या असल्यास दही आणि लिंबाची पेस्ट लावल्याने आराम मिळेल. आठवड्यातून दोनदा हा उपाय अमलात आणा.

केस गळतीवर असरदार

कढी पत्ता दह्यात मिसळून पूर्ण केसांवर लावल्याने केस गळतीवर फायदे मिळेल तसेच पांढर्‍या केसांपासून मुक्ती ही मिळेल.

केस वाढतीसाठी

दही, नारळाचे तेल आणि जास्वंद फुलाची पाने मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून 1 ते 2 तासांसाठी तसेच राहून द्या. नंतर केस धुऊन कंडिशनर लावून घ्या.

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय