Posts

Showing posts from September, 2017

पाय सुंदर बनवण्यासाठी काही टिप्स

Image
तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम इत्यादि पुरेसे नाही तर साफ-सफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी बूट-चप्पल इत्यादी घाला. पायांची योग्यप्रकारे साफसफाई करा. वेळोवेळी पेडीक्योर करीत राहणे पायाच्या त्वचेला नरमपणा आणते. आंघोळ करताना पायांना वॅसलीन तेल इत्यादी लावावे. शिवाय बाहेर जाताना पायांवर चांगल्या क्वालिटीचे क्रीम लावावे. ज्यामुळे पाय मुलायम राहतात. पायाचा कोरडेपणा थांबवण्यासाठी दररोज रात्री पाय चांगल्याप्रकारे धुऊन क्रीम लावून झोपावे. त्यामुळे पाय कोमल राहतील. पायांची त्वचा मुलायम होण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ युक्त जैतून तेल वापरावे. जैतून तेल अँटीआक्सिडंट्सने भरपूर असते, जे त्वचेला मृदू बनविते. व्हिटॅमिन आणि प्रोटिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेसह पायांच्या नखांचीही देखभाल खूप आवश्यक आहे. अशात तुम्ही त्वचेचा न...

रात्रभरात गोरे व्हा

Image
उजळ त्वचेसाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरून वैतागला असाल तर आम्ही आपल्याला येथे सांगत आहोत अगदी सोपा आणि घरगुती उपाय. काही घरगुती फेस मास्क लावून रात्रभरात त्वचा उजळ होऊ शकते. मुख्य म्हणजे हे उपाय अगदी नैसर्गिक आणि स्वस्त आहे. पिगमेंटेशन आणि सन टॅनिंगमुळे त्वचा सावळी पडू लागते. त्वचेसंबंधी अश्या समस्यांपासून सुटकारा मिळविण्यासाठी हे नैसर्गिक उपाय अमलात आणावे. येथे‍ सांगण्यात येत असलेले मास्क आपण रात्रभर चेहर्‍यावर लावून झोपू शकतात आणि सकाळी उठल्यावर आपल्या चमत्कारिक प्रभाव जाणवेल. परंतू कोणतेही मास्क लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून बघावे. कुठल्याही प्रकाराची रिअॅक्शन होत असल्यास हे वापरणे टाळावे. केळ- गुलाबपाणी एक केळ मॅश करून त्यात गुलाब पाणी मिसळा. चांगल्यारीत्या मिसळून चेहर्‍यावर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. दही- काकडी काकडी आणि दही दोन्ही त्वचा उजळविण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. 2 काकड्या बारीक वाटून घ्या. यात एक चमचा दही टाका. हा मास्क चेहर्‍यावर लावा. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका. लिंबू रस- मध अर्धा चमचा लिंबाच्या रसात मध मिसळा. हे मास्क...

अरे वा! घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे

Image
बाजारात मिळणारे कॉस्मेटिक महाग तर असतातच पण आपल्या स्कीनवर विपरित परिणाम टाकणारे असतात. त्यातून ओठ हे तर सर्वात नाजुक असतात, यावर रोज बाजारातील लिपस्टिक लावली तर ओठ काळे पडू लागतात. म्हणून येथे आम्ही सोपी पद्धत सांगत आहोत ज्याने आपण घरी लिपस्टिक तयार करू शकता. साहित्य: एक बीट, 1/2 कोकोनट ऑइल, 1/2 चमचा मधमाश्यांचे मेण, 1/2 चमचा कोको बटर कृती:  बिटाचे पातळ काप करून वाळू द्या. डिहायड्रेटरमध्ये हे काप 120 डिग्रीवर 8 तास ठेवून वाळूव शकता. नंतर मिक्सरमधून वाटून पावडर तयार करा. मंद आचेवर एका भांड्यात अर्धा ते 1 कप पाणी टाकून त्यात मेण, कोको बटर, कोकोनट ऑइल आणि बीट पावडर मिसळा. चांगले ढवळा. गडद रंगासाठी अधिक पावडर किंवा वाळलेल्या चेरीज वापरू शकता. घट्ट झाल्यावर मऊ कपड्याने गाळून घ्या. लिप कंटेनरमध्ये हे मिश्रण ओतून घ्या. थंड होऊ द्या. आपले लिपस्टिक तयार झाले. हे पूर्ण पणे नैसर्गिक असल्यामुळे ओठ काळे पडणार नाही.

ऑईली स्कीनची काळजी कशी घ्याल!

Image
 * त्वचा ऑईली असल्यास क्लिन्झींगला पर्याय नाही. क्लिन्झींगमुळे त्वचेवर साठलेली घाण, मेकअप, मृत त्वचा नाहीसे होऊन रंध्रे मोकळी होतात. या उपायाने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. आठवडय़ातून एकदा लाईट स्क्रब केल्याने फायदा होतो. * ऑईल फ्री फेसवॉश नियमित वापरल्यास त्वचा ऑईल फ्री राहते. ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर करू नका. * तांदळाच्या पिठीमध्ये पुदीन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून चेहर्‍यावर दहा मिनिटे हा पॅक ठेवावा. दहा मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून पॅक काढून टाकावा.  * पर्समध्ये नेहमी गुलाब अथवा लॅव्हेंडर बेस असलेलं स्किन टॉनिक ठेवा. त्याबरोबर वेट टिश्युजही हवेत. दर दोन तासांनी यानं चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा टवटवीत राहते. * ऑईली स्किनवर अँकनेचा त्रास होत असेल तर टी ट्री अँटी पिंपल जेल अथवा जेल मॉईश्चरायझर वापरणं चांगलं. * त्वचेचं सीबम ऑईल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वज्र्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भोजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सॅलड असणं अतिआवश्यक आहे.

सौंदर्याचे पहिले पाऊल : स्नान

Image
आपण चांगले दिसण्यासाठी कित्येक खटाटोप करतो. पण सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न तेंव्हाच यशस्वी ठरतील जेंव्हा आपण स्वच्छ आणि प्रसन्न असू. म्हणूनच सौंदर्याचे पहिले पाऊल म्हणजे स्नान. आंघोळ या शब्दाचा अर्थ फक्त साबण लावून पाणी ओतणे हा नसून यात संपूर्ण शरीराची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिने अतिशय गरम किंवा अगदीच थंड पाण्याने आंघोळ करणे चुकीचे आहे. थंड पाण्याने त्वचा कोरडी होते, तर गरम पाण्यातने त्वचेवर सुरकुत्या पडतात. कोमट पाणी वापरणे सर्वोत्तम आंघोळीच्या पाण्यात कृत्रिम सुगंध न मिसळता नैसर्गिक सुगंधी तेलांचा वापर करावा. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी रंध्रे मोकळी करावी लागतात, त्वचेवर धूळ आणि मृत पेशी चिकटून छिद्रे बंद होतात. त्यामळे रोगही पसरतात. त्वचा काळसर दिसायला लागते. यावर आंघोळ हा सर्वोत्तम उपाय आहे. टीव्हीवर भलेही विविध साबणांची भलामण करणार्‍या जाहिराती आल्या तरी आपण साबणाचा शक्य तितका कमी उपयोग करावा. कारण साबणात स्वच्छतेपेक्षा सुंगधाकडेच लक्ष दिले जाते. खरे तर वापरण्यासाठी बेबी सोप चांगला. हे हास्यास्पद वाटेल पण खरे आहे. कारण तीव्र स्वरूप...

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क

Image
सर्वात आधी एलोवेरा स्कीनसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे पाहू: त्वचेची टॅनिंग, रॅशेज, सुरकुत्या, पुरळ या सर्वांवर एलोवेरा प्रभावी आहे. याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा नरम राहते. याने त्वचा मॉइश्चराइच राहते. एलोवेराने त्वचेवरील जखमदेखील बरी होते. याने स्कीन टोन होते. यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी: एलोवेरा टी ट्री ऑइल मास्क 1 चमचा एलोवेरा जॅल मध्ये 7-8 थेंब टी ट्री ऑइल मिसळून हे मास्क रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी चेहरा पाण्याने धुवावा. > टॅनिंग आणि सनबर्न मिटवण्यासाठी: एलोवेरा- कुकम्बर मास्क 1 लहान काकडीची प्युरी तयार करा. यात 2 चमचे एलोवेरा जॅल मिसळा. एका चमच्यात 1 एस्पिरिन टॅबलेट घोळून घ्या. ही पेस्ट इतर मिश्रणासोबत मिसळून तयार मास्क 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा. नंतर स्वच्छ करून घ्या.  यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी:  एलोवेरा-ओट्स-ओनियन मास्क एका बाऊलमध्ये अर्धा कप फ्रेश एलोवेरा जॅल घेऊन त्यात अर्धा कप कांद्याचा रस आणि 1 चमचा ओट्स मिसळा. तयार स्क्रबरन...

हे जाणून घेतल्यावर लगेच लावाल केसांना दही

आरोग्यासाठी दही खाणे उत्तम आहे हे तर सर्वांच माहीत आहे पण दह्याने त्वचा आणि केसांचेही सौंदर्य वाढतं हे कमी लोकांच माहीत असेल. नियमित दही लावल्याने चेहर्‍यावर ग्लो येतो आणि केसांवर वापरल्याने डेड्रफ दूर होतं आणि केसही मजबूत होतात. तर आता साबण आणि शैंपूवर खर्च करणे सोडून दही लावा आणि जाणून घ्या किती गुणकारी आहे हे ते: केसांसाठी कंडिशनर हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करतं. पूर्ण केसांवर दही लावून शॉवर कॅप लावून घ्या. 30 मिनिटाने केस धुऊन टाका. केस होतील मुलायम दह्याला मधात मिसळून मास्क तयार करा. हे केसांना लावल्याने केस मुलायम होती. हे 15 ते 20 मिनिटापर्यंत केसांना लावून ठेवावे नंतर धुऊन घ्यावे. केसांमध्ये चमकसाठी केसांना मॉइस्जराइज करून चमक आण्याची असेल तर दह्याला मायोनीजबरोबर मिसळावे. हे मिश्रण केसांच्या शेवटल्या कोपर्‍यापर्यंत लावावे. अर्ध्या तासाने केस सामान्य पाण्याने धुऊन टाकावे. दोन तोंडी केसांपासून मुक्ती आठवड्यातून दोन दिवस केसांमध्ये दही लावा, आपली दोन तोंड असलेल्या केसांची समस्या सुटेल. केस मजबूत होतील. कोंड्यापासून सुटका कोंड्याची समस्या असल्यास दही...

रोज वापरू नये हे मेकअप प्रॉडक्ट्स

Image
मेकअप ही प्रत्येक स्त्रीची आवड असते. त्यातून आवडतं ब्रँड, कलर, आणि परर्फेक्ट मेकअप किट हाती लागून गेली तर दररोज मेकअप करण्याची सवयच पडू लागते. मग चेहरा, डोळे, केस त्या प्रॉडक्ट्सविना बघायला आवडत नाही मग याने नैसर्गिकपणे त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होऊ लागतो. काही मेकअप प्रॉडक्ट्स असे असतात जे दररोज वापरू नये. तर बघून घ्या असे कोणते प्रॉडक्ट्स आहे जे वापरल्याने आपल्या त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो: ड्राय शांपू केस धुवायला वेळ नसल्यास लोकं ड्राय शांपू वापरतात. परंतू याच्या अतिवापरामुळे केस रुक्ष आणि कमजोर होऊ लागतात. केस तुटू लागतात आणि त्यांची गुणवत्ताही घटते. डिप कंडिशनर डिप कंडिशनर दिल्यावर केस सुंदर दिसतात परंतू याचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतं आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं. हा प्रॉडक्ट दररोज वापरणे योग्य नाही. मेडिकेटेड लिप बाम फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरलं जातं. पण निरंतर हे वापरल्याने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते. मेकअप प्रायमर मेकअप करण्यार्‍यांना हा प्रॉडक्ट वा...

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

Image
केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती दूर करू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेले हेअर मास्क योग्य ठरेल. आवळ्याला इंडियन गूस्बेरी म्हटले जातं. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात. आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता. केसांसाठी तेल एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा. हेअर मास्क 1 चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार क...

अब किसी भी उम्र में पाएं स्वस्थ त्वचा

Image
प्रदूषण, धूल-मिट्टी, तनाव, धूप और दौड़भाग न जाने कितनी चीजों का सामना हमारी त्वचा को प्रतिदिन करना पड़ता है। ऐसे में समय रहते उचित देखभाल न करने से तरह-तरह की परेशानियों का सामना करना पड़ता है। हर उम्र में खूबसूरत व आकर्षक दिखने के लिए त्वचा की देखभाल के साथ-साथ स्वस्थ खान-पान भी जरूरी है। जवां दिखने के लिए जरूरी है कि आप अपनी त्वचा की जरूरतों को समझें और उन्हें पूरा करने की कोशिश करें। कुछ खास व आसान उपायों के जरिए आप हमेशा खूबसूरत व जवां दिख सकती हैं। जानें उन उपायों के बारें में- सूर्य की रोशनी से बचें धूप से स्किन को कई तरह से नुकसान पहुंचता है। इस मौसम की तेज धूप भी आपका रंग चुरा सकती है। स्किन टैन होना, झुर्रियां, स्पॉट् व अन्य त्वचा संबंधी समस्याएं हो सकती हैं। इसलिए बाहर निकलने से पहले सनस्क्रीन लगाना ना भूलें। सुबह दस से चार के बीच की धूप में निकलने से बचना चाहिए क्योंकि इस समय सूर्य की रोशनी काफी तेज होती है। चेहरे की सफाई है जरूरी हफ्ते में एक बार चेहरे की क्लीजिंग, टोनिंग, स्क्रबिंग व मसाज जरूरी है। इसे चेहरे पर जमा डेड स्किन हट जाते हैं और रोम छिद्र खुल जा...

Ten Best Marathi beauty Tips

1) चेहरयावरील सुरकुत्या घालविण्यासाठी तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याच्या रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते. 2) उन्हापासून त्वचा सांभाळा उष्णतेमुळे ओठ, तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉयश्चरायझिंग क्रीम लावून हळूवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा. 3) चेहरा उजळण्यासाठी एक चमचा टोमॅटोचा गर, चिमूटभर हळद. अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍याला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल. 4) कोंडा घालविण्यासाठी केसातील कोंडा फार सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्याघरी औषध तयार करता येईल 5) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये. 7) केसांचा तेलकटपणा ...

गर्मियां आ रहीं हैं तो ये फेस मास्‍क लगाएं

Image
गर्मियों में त्‍वचा की देखभाल करना बहुत ही जरुरी है। त्‍वचा को हमेशा क्‍लीजिंग, टोनिंग और मॉस्‍चोराइजिंग करने की आवश्‍यकता होती है जिससे वह चमकदार बनी रहे। साथ ही सूरज की धूप से भी त्‍वचा की चमक खतम हो जाती है इसलिए जरुरी है कि अपने चेहरे को बचाया जाए। वैसे तो गर्मी को बीट करने के लिए कई सारे प्रोड्क्‍ट बाजार में हैं पर आज हम आपाको कुछ ऐसे फेस मास्‍क बताएगें जिसको आप आसानी से घर में बना सकती हैं।   फेस मास्‍क-   1.कुकुंबर मास्‍क-  त्‍वचा पर ठंडक का एहसास करनाने के लिए यह एक ऐसी सब्‍जी है जो आम तौर पर इस्‍तमाल की जाती है। खीरे का प्रयोग किसी भी प्रकार की त्‍वचा के लिए किया जा सकता है। यह फेशियल मास्‍क आराम से घर में बनाया जा सकता है। बस केवल खीरे को पीसे और उसमें गुलाब जल को मिलाएं। अगर चेहरा ड्राय है तो आप उसमें ग्‍लीसरीन मिला सकते हैं। इसको अपनी गर्दन और चेहरे पर 15 मिनट तक के लिए लगाएं और ठंडे पानी से धोलें। 2.स्‍ट्राबेरी मास्‍क-  अगर चेहरे पर टैनिंग है तो इसे लगाएं जिससे चेहरा चमकदार बन सके और धूप के दाग से भी निजात मिल सके। कुछ स्‍ट्राबेरी मैश करें और...

राईस पॅक लावा, टॅनिंग घालवा

Image
ऋतू कोणताही असला तरी टॅनिंगचा धोका असतोच. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे त्वता टॅन होतो, अकाली सुरकुत्या पडतात. यावर उपाय म्हणून घरगुती फेस मास्क बनवता येईल. साहित्य : अर्धी वाटी शिजवलेला भात, तीन छोटे चमचे हळद पावडर, दोन चमचे मीठ, एक चमचा दही, एक चमचा मध. कृती : एका बाऊलमध्ये शिजवलेला भात घ्या. त्यात एक चमचा मध घाला. भातात हळद पावडर, मीठ आणि दही मिसळून मिश्रण एकजीव करा. पॅक लावताना हे पेस्ट स्वरूपातलं मिश्रण चेहरा आणि मानेवर लेपस्वरूपात लावा. या मिश्रणाचा जाड थर लागायला हवा. साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांनंतर लेप पूर्णपणे सुकेल. त्यानंतर गरम पाण्याने रगडून लेप काढून टाका. आठवड्यातून चार वेळा हा लेप लावल्यास टॅनिंगपासून मुक्ती मिळेल. तांदळात चांगल्या मात्रेत अॅण्टिऑक्सिडंट तत्त्वं असतात. या गुणधर्मामुळे त्वचेतील कोलाजेनची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. या पॅकमध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळदीमधील गुणतत्त्वांमुळे त्वचेवरील घातक जीवाणू आणि विषाणूंचा बंदोबस्त होतो. सहाजिकच त्यामुळे त्वचासंसर्ग कमी होण्यास मदत होते. चेहर्‍यावरील मुरूमांचे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं...

बर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो

Image
* रोज 3 ते 4 मिनिट बर्फाने चेहर्‍याची मसाज करा. याने ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि स्कीनचा ग्लो वाढेल. रोज 2-3 बर्फाचे तुकडे खाल्ल्याने वजन कमी होईल. जळलेल्या त्वचेवर लगेच बर्फाचे तुकडे ठेवावे. जळजळ कमी होते आणि छाले पडत नाही. * रात्री झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍याची मसाज केल्याने पिंपल्स दूर होतात. * अधिक वेळेपर्यंत कंप्यूटरवर काम केल्यानंतर डोळ्यांवर आईस क्यूब ठेवावे. गारवा आणि आराम मिळेल.रोज * बॅक पेन किंवा संधिवात असलेली जागा बर्फाने शेकावी. वेदनांपासून मुक्ती मिळते. * इंजेक्शन लावल्यानंतर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागेवर बर्फ घासावे. * लहान-सहान जखमेवर आईस क्यूब ठेवल्याने रक्ताचा प्रवाह थांबेल आणि वेदना कमी होतील. * पायात लचक आल्यास कपड्यात बर्फ गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. सूज आणि वेदना कमी होईल. * झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍यावर मसाज केल्याने स्किन टाइट होईल आणि हेल्थी राहील. * मसल्समध्ये ताणलेल्या असल्यास कपड्यात आईस क्यूब गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. आराम मिळेल. * दात दुखत असल्या किंवा हिरड्यावर किंवा गालावर बर्फाचा तुकडा ठेवल्याने दातांना गार...

सौंदर्यवर्धना

Image
स्वयंपाकघरातील पदार्थापासून सौंदर्यवर्धनाचे उपचार सौंदर्याची काळजी घेणे हे प्रत्येक स्त्रीला मनापासून वाटत असते .  प्रथम मुलांची काळजी व नंतर घरातील इतर जणांची काळजी घेताना गृहिणी स्वत:लाच विसरतात . चाळीशी आली की त्वचा , डोळे , केस यांच्या विविध तक्रारी सुरु होतात .  ब्युटीपार्लर मध्ये वारंवार जाण्यासाठी वेळ व पैसा दोन्हींची कमतरता जाणवते . पण प्रत्येक गृहिणींच्या हे लक्षात येत नाही की , स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांचा सौंदर्यवर्धनासाठी खूप उपयोग होतो . स्वयंपाकघरातील पदार्थापासून स्वाद , गंध व शरीर-मनाची तृप्ती करणारे अन्नपदार्थ बनवले जातात .  पण आपल्या रूपासाठी वेगळा एकही पैसा खर्च ण करता उपचार होतात .  दुध , दही , तूप , मध , विविध भाज्या डाळी इ. पासून स्त्रियांना आपले सौंदर्य जोपासता येते . १)      सकाळी दुध तापविण्यापूर्वी तीन ते चार टेबल स्पून दुध वातीत काढावे .  ह्या दुधाने चेहरा , मान , गळा सर्व ठिकाणी चोळावे .  घरगुती क्लिन्झिंग होऊन त्वचा साफ होते .  या दुधात हळदीची चिमुट , ज्येष्ठमध , अनंतमूळ , चंदन , गुलाब , खस , म...

सौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...

Image
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.  कैरी : हल्ली कैर्याय बाजारात दिसायला लागल्यात आता त्या थोड्या महाग असल्या तरी त्या तुमची त्वचा मुलायम आणि कांतिमान बनवण्यास मदत करणार्या् आहेत. एक कैरी उकळवून त्याचा गर चेहरा, गळा, मानेवर चोळा आणि वाळल्यावर धुवा.  संत्री : संत्र्याची साल उन्हात वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती दुधात कालवा हे मिश्रण चेहर्यागवर लावा तेलकट त्वचेस याचा फायदा होईल चेहर्यादचा रंग उजळण्यास मदत होईल.  काकडी : त्वचा ब्लीच करण्यासाठी याचा रस चेहर्यारस चोळावा किंवा चेहर्याेवर फोडी ठेवा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा.  डाळिंब : पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर दररोज चोळा त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होईल ओठांवरुनही त्याचा रस फिरवा, ओठांचा रंग सुधारेल चेहर्याववरील डाग घालवण्यासाठी डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटा आणि ती पेस्ट चेहरा, मानेवर लावा सुकल्...

तर जास्त वेळ टिकेल लिपस्टिक...

Image
ओठांवर लिपस्टिक लावल्यावर एक वेगळाच लुक दिसतो. पण कित्येकदा अधिक तास बाहेर राहायचे असेल तेव्हा तयार होताना लावलेली लिपस्टिक डल होते आणि अधून-मधून पुसली जाते. हे खूपच वाईट दिसतं. म्हणून आपण पाहू या असे काही सोपे उपाय ज्याने लिपस्टिक टिकून राहील: आपले ओठ हेल्थी असतील तर लिपस्टिक अधिक काळपर्यंत टिकून राहते. ओठांना निरंतर स्क्रब करत राहावे. यासाठी टूथब्रशही वापरू शकता. ओठांना बाम लावण्यानेदेखील फायदा होतो. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिल अप्लाय करा. यासाठी आपण न्यूड लिप कलर वापरू शकता, जे प्रत्येक लिप शेडसाठी उपयुक्त ठरेल. लिप पेन्सिल ओठांच्या मध्ये आणि खालील बाजूला लावून पूर्ण ओठांवर मिक्स करा. लिप ब्रश वापरणे योग्य असतं. याने आपल्या इच्छेप्रमाणे लाइट डार्क शेड देण्यासाठी आपल्या हातावर नियंत्रण ठेवता येतं. पण ब्रशमध्ये खूप कलर भरू नका. याने शेड बिघडण्याचा धोका वाढतो. आठवड्यातून एकदा ब्रश नक्की स्वच्छ करावा. आपल्या ओठांवर बोटांनी ट्रांसलुऐंट पावडर लावा. याने शेड सेट होईल आणि आपली लिपस्टिक पसरणारही नाही आणि हलकीही पडणार नाही. यानंतर पुन्हा एक कोट लावा. लिपस्टिक अधिक वेळापर्यंत टि...

चेहर्‍यावर घासा टोमॅटो, पहा फरक

Image
कधी-कधी घरात उपलब्ध असणार्‍या साधारण वस्तूदेखील त्वचेवर प्रभाव सोडून जातात. आणि आम्ही उगाच महागड्या क्रीमच्या मागे पळत असतो. येथे आम्ही गोष्ट करत आहोत आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणार्‍या टोमॅटोबद्दल. केवळ अर्धा टोमॅटो वापरून आपल्या चेहर्‍यावर चमक येऊ शकते. टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहर्‍यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल. आपण टोमॅटो ज्यूसला फेस मास्कच्या रूपात वापरू शकता याने स्किन स्वच्छ होईल. चेहर्‍यावर पुरळ असतील तर हा फेस मास्क कामास येईल. यासाठी टोमॅटो स्लाइस कापून घ्या. टोमॅटो उकळून त्याच्या सालं आणि बिया काढून वाटून घ्या. हे मिश्रण पूर्ण चेहर्‍यावर लावून घ्या. 1 तासाने चेहरा धुऊन घ्या. या पेस्टमध्ये काकडी किंवा दही मिसळू शकतात. आपल्याकडे वेळ नसल्यास एका वाटीत टोमॅटो रस घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. हे चेहर्‍यावर लावून पाच मिनिट राहून द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

मेकअप इज अ आर्ट

Image
मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला ऑफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे शिकून घेतल्यास सोयीये जाते. फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळतात. लिक्वीड, क्रिम आणि पावडर. फाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा वापर करावा. चेहर्‍यावर फाउंडेशन लावून घेऊन हलक्या हाताने स्पंज फिरवावा. चेहर्‍याप्रमाणेच मानेवरही फाउंडेशन लावावे. फाउंडेशनला मेकअपचा बेस मानले जाते. त्याने चेहर्‍यावरील छोटे डाग, खड्डे, काही वर्तुळे झाकली जातात. त्यामुळे फाउंडेशन एकसारखे पसरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्याचे लेअर्स स्पष्ट दिसून येतात आणि मेकअप पॅची दिसतो. त्वचेचा पोत लक्षात घेऊन फाउंडेशनचा प्रकार निवडावा. मेकअप करताना डोळ्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यावे. प्रथमदर्शनी डोळ्यांकडेच लक्ष जाते. त्यामुळे येथील छोटीशी चूकही सगळा मेकअप बिघडवून टाकते. डोळ्याच्या मेकअपसाठी शक्यतो वॉटरप्रुफ लाँग ‍लास्टिंग मेकअप साहित्य वापरावे. मेकअपची सरुवात आय शॅडो लावून करावी. त...