बहुगुणी काकडी

काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.

गुणधर्म :

काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.

उपयोग :

काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.

फायदे :

काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेहीसांठी  देखील काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात. 

Comments

Popular posts from this blog

केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

Beauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय