Posts

Showing posts from February, 2018

निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स

Image
तुमची त्वचा दैनंदिन धावपळीचा ताण सहन करते असते, तेव्हा ती वार्धक्याकडे झुकण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हांला निरोगी त्वचेसाठी या सामान्य टिप्सची गरज लागते आणि खरेच आमच्यावर विश्‍वास ठेवा, तुम्हांला अगदी कमी वेळात उत्तम परिणाम पाहून निश्‍चितच अत्यानंद होईल! निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स 1) प्रदूषणाला नाही म्हणा प्रदूषण, धूर आणि आपल्या धावपळीच्या जीवनातील अनारोग्यकारक सवयी यांच्यामु़ळे आपल्या त्वचेची छिद्रे बंद होऊन आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी उपाय म्हणून, आम्ही पॉन्ड्सच्या प्युअर व्हाइट डीप क्लिंजिंग फेशिअल फोमवर विश्‍वास ठेवतो. जो ॲक्टिव्हेटेड कार्बन आणि बी3 जीवनसत्त्व यांच्यासह तयार केला गेला आहे. हा अशा एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करतो जो त्वचेच्या छिद्रांमध्ये पोहचून त्यांत असलेली कोणतीही अस्वच्छता काढून टाकतो. स्वच्छ, तेजस्वी त्वचा आता तुमच्यापासून फक्त एक वॉश दूर आहे! 2) उत्सव सौंदर्यवर्धक निद्रेचा जरी गॅजेट्स आणि पार्टीज या भुरळ पाडणार्‍या असल्या, तरीही झोपी जाण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. जेव्ह...

त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

Image
१)      त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार , पुरेशी झोप , भरपूर पाणी , सौम्य व्यायाम व शांत स्वभाव याची आवश्यकता असते .  त्वचा मुलायम व सुंदर दिसण्याची जणू चार सूत्रे आहेत . २)     रोजच्या रोज क्लिन्झिंग , टोनिंग , मॉइश्चरायझिंग आणि कंडीशनिंग ची गरज असते . ३)     त्वचेची निगा म्हणजे त्वचेची स्वच्छता दररोज करायला हवी .  यामध्ये मेकअप काढणे , रोमछिद्रे स्वच्छ करणे , मृतपेशी काढून टाकणे हे करावे लागते .  टोनिंग केल्याने त्वचेला नवीन चैतन्य प्राप्त होते .  रक्तप्रवाह सुरळीत चालल्यामुळे त्वचा कांतिमान दिसते .  मॉइश्चरायझर केल्याने त्वचेचा ओलसरपणा कायम ठेवला जातो .  तर कंडीशनिंगमुळे त्वचेतील आम्लाचा समतोल राखला जाऊन इतर असमतोल दुरुस्त होण्यास मदत होते . ४)     आपण बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याचा मसाज करून घेतो , परंतु रोज घरच्या घरी जर सकाळच्या वेळीस मॉइश्चरायझर व रात्रीच्या वेळेस कंडीशनर लावताना मसाज केल्यास त्वचेवरील छिद्रे निरोगी राहून उत्सर्जित ग्रंथीच्या कार्यात वाढ होते...

7 दिवसात स्वच्छ करा काळी मान

Image
उन्हाने गळ्यावर टेनिंग होऊन जाते ज्याने आपला चेहरा जरी गोरा दिसतं असेल तरी मान काळीच दिसते. बेकिंग सोड्याच्या मदतीने मान स्वच्छ केली जाऊ शकते. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. कशी तयार कराल ही पेस्ट: -> एका बाऊलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. -> आता या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. नारळाच्या तेलाने घाण निघून जाते आणि पोर्स स्वच्छ होतात. -> आता एका नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या आणि 2 मिनिट तसेच राहू द्या. टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने पोर्स खुलतील. -> आता पॅक लावण्यापूर्वी आधी पेच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसल्यास मानेवर लावा. -> या पॅकची हलकी लेयर मानेवर लावा. 15 मिनिट तसेच राहू द्या. वाळू लागल्यावर पाण्याच्या मदतीने...

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय

Image
हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो. हळद आणि दही:  1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील. हळद आणि काकडीचा रस:  हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. हळद आणि लिंबाचा रस: ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या आणि मॉइस्‍चराइजर लावा. हळद आणि चंदन पावडर: 1 चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहर्‍यावर 20 मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. हळद, दूध आणि मध: 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध...

नितळ कांती व त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या

Image
१)      नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे .  चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे . २)     दुध पावडर १ टेबल स्पून , मध २ टेबल स्पून , १ चिमुटभर हळद पावडर आणि      अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा , मान , उरल्यास हाताला चोळून लावावी .      वाळल्यानंतर धुऊन टाकावी . ३)     कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी .  त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे .  हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे . ४)     ओली हळद व मोहरी वाटून दररोज Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे .  हळू-हळू Black हेडस कमी होतात . ५)    ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे .  थोडया वेळाने धुऊन टाकावे .  कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे .  नंतर धुऊन...

केसांचे वाढीसाठी घरगुती उपाय

Image
केस आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आणि सुंदर ओळख करून देण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलतात . लांब आणि आकर्षक केसांसाठी घरच्या घरी काही उपाय करता येतात . त्याबद्दल थोडस या लेख मध्ये . १ ) कोरफडीच्या एका मोठ्या पानाला एका बाजूने चाकूने कापून त्यात मावतील  इतके मेथीचे दाने भरावेत . २)  lamb kesकोरफडीच्या गरातील पाण्यावरच मेथीच्या दाण्यांना चार दिवसांनतर छानपैकी मोड (कोंब ) येतील. नंतर कोरफडीचे लहान लहान तुकडे करून अर्धा लिटर खोबरेल   तेलात  मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांसह उकळून घ्यावेत. ३) कोरफडीतील  पाण्याचा अंश संपेपर्यंत मंद आंचेवर तेल उकळावे अन थंड झाल्यावर बाटलीत भरून   ठेवावे . ४) रात्री झोपताना दिवसाआड केसांना लावावे . ५) मेथी व कोरफड युक्त तेलाने केस गळायचे थांबून हमकास वाढतातच. तुम्हालाही काही अश्या घरगुती युक्त्या आणि उपाय माहिती असतील तर प्रतिक्रिये द्वारे  नक्की कळवा .

हळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय

Image
हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहर्‍यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्‍टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो. हळद आणि दही:  1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील. हळद आणि काकडीचा रस:  हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्‍यावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. हळद आणि लिंबाचा रस: ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या आणि मॉइस्‍चराइजर लावा. हळद आणि चंदन पावडर: 1 चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहर्‍यावर 20 मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. हळद, दूध आणि मध: 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध...

सौंदर्य वाढविण्यासाठी उशी न घेता झोपावे

Image
डोक्याखाली उशी घेऊन झोपणे अगदी सामान्य आहे. अनेक लोकांना उशीविना झोप येत नाही. परंतू विशेषज्ञांप्रमाणे उशीविना झोपणे अधिक फायदेशीर आहे याने शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी झोप येते. उशी ने घेता झोपण्याने आरोग्य तर उत्तम राहताच सौंदर्य वाढविण्यासाठी हे योग्य आहे. पिंपल्सपासून मुक्ती उशीविना झोपल्याने चेहर्‍यावर पिंपल्स येण्याची शक्यता नाहीशी होते. कारण उशी वापरल्याने त्यावर जमा असलेल्या धुळीमुळे पिंपल्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरकुत्या येत नाही उशी वापरल्याने चेहर्‍यावर दबाव पडत असतो ज्याने वयापूर्वी सुरकुत्या येतात. तारुण्य वाढतं उशी घेऊन झोपल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरदेखील थकवा जाणवतो परंतू उशी न वापरल्याने तणावरहित झोप लागते ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते आणि आपण नेहमी तरुण दिसतात. ग्लो वाढतो ज्यांना झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी उशी घेतल्याविना झोपावे ज्याने शांत झोप लागते आणि रिलॅक्स जाणवतं. शरीर रिलॅक्स असल्यास चेहर्‍यावरील ग्लो आपोआप वाढतो.                      ...

हिवाळ्यात सौंदर्यवृद्धिंकरिता टिप्स

Image
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. पाय पांढरे, रुक्ष दिसतात, टाचांना भेगा पडायला लागतात, तर हाताच्या त्वचेवर ओरखडे आल्यासारखे व्रण पडतात. चेहर्‍याच्या आणि मान्ेावरच्या त्वचेचा भागही काळपट दिसायला लागतो. या दिवसात दर २0 ते २५ दिवसांनी फेशियल करणे उपयुक्त ठरते. अनेकदा बिझी शेड्युलमुळे ठराविक वेळेत पार्लरला जाणे, ट्रीटमेंट घेणे शक्य होत नाही. अशावेळी घरगुती आणि बजेट टिप्स सौंदर्यवृद्धिंकरिता पुरेशा ठरतात. 1. हिवाळ्यात होणारी रुक्षता टाळण्याकरिता आंघोळीपूर्वी अर्धा कप दुधाने सर्वांगाला मॉलिश करा अथवा अर्धा चमचा व्हिनेगर आंघोळीच्या पाण्यात टाका. त्वचा कोरडी पडत नाही. 2. पिकलेल्या केळीचा अर्धा भाग वा दोन चमचे क्रिम होईल इतपत भाग घेऊन चेहर्‍याला मॉलिश करा. साधारणपणे दहा मिनिटे हा पॅक लावा. त्यानंतर धुवून टाका. आठवड्यातून तीनदा असा पॅक लावल्यास साधारण १५ दिवसांत चेहर्‍यातील बदल लक्षात येईल. 3. कोणत्याही कंपनीचे क्लिनजर घ्या. त्यात एक चमचा साखर मिक्स करा. दोन्हीची पेस्ट तयार झाल्यानंतर ही पेस्ट चेहर्‍याला, तसेच मानेच्या त्वचेवर लावा. साधारण १0 ते १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. फेशिय...

भुवयांमधील कोंड्यावर उपाय .

Image
कोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा जास्त त्रासदायक आहे. भुवयात कोंडा झाला तर डोळे खाजणे, जळजळणे हा त्रास होतो. म्हणूनच हा त्रास असल्यास स्वच्छतेकडे लक्ष पुरवायला हवं. हा कोंडा घालवण्यासाठी रोजमेरीचं तेल गुणकारी आहे. यात जीवाणुरोधी गुण असतात. त्यामुळे संसर्ग टळतो आणि कोंडा नाहीसा होतो. या तेलानं भुवयांवर मसाज केल्यास कोंडा नाहीसा होतो. कोंड्याचा त्रास असेल, तर भुवयांवर काबुली चण्यांची पेस्ट लावावी. यातील ब जीवनसत्त्व आणि जिंकमुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. मेथीच्या पेस्टचा लेप लावल्यासही भुवयांतला कोंडा कमी होतो. भुवयांवर लिंबाचा ताजा रस लावल्यानं कोंडा कमी होतो. आहारामध्ये तळकट पदार्थ टाळून कोंड्यावर उपाय होऊ शकतो.

त्वचेचे सौंदर्य खुलविण्याचे ११ नैसर्गिक उपाय

Image
“सौंदर्य हे मनात दडलेले असते. ते वस्तुत, व्यक्तीत अथवा पाहणाऱ्याच्या दृष्टीत नसते. ते प्रत्येक व्यक्तीच्या दृदयात असते,” असे श्री श्री रविशंकर म्हणतात. ते म्हणतात हे ह्रदयातील सौंदर्यच तुमच्या चेहऱ्यावरील तेजात परावर्तीत होते. सौंदर्य हे त्वचेच्या पलीकडे असते.  तरी पण आपली त्वचा आपले सौंदर्य अभिव्यक्त करते. आपण द्रव्य पदार्थ आणि चेतनेने बनलेले आहोत. अर्थात आपली त्वचा हे फक्त बाहेरील दृश्य आवरण नसून ती सजीव असते! ती शरीराच्या इतर अवयावांसाराखीच असते व तिची काळजी व निगा राखावी लागते. सौंदर्य खुलविण्याचे जितके उपाय उपलब्ध आहेत ते केवळ शारीरिक बाबींकडे लक्ष देतात पण ते शरीरातील प्रत्येक पेशी आतून कशी उजळेल आणि उर्जा व सौंदर्य कसे उत्सर्जित करेल याचे गुपित सांगत नाहीत. वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा निस्तेज होत जाते. ताण, दुर्लक्ष आणि सुरकुत्या, काळी वर्तुळे, शुष्क चट्टे, पिटीका, थकवा आणि निस्तेजपणा चेह-यावर दिसू लागतो. . तथापि असे अगदी साधे पण नैसर्गिक उपाय तजेलदार त्वचेसाठी आहेत की जे तुमची त्वचा नितळ आणि पुनरुज्जीवित करतात. १ मूळ स्त्रोताकडे जा. प्राचीन आयुर्वेदात सौंद...

चेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी

Image
आपला चेहरा दिवसभर टवटवीत राहावा, नेहमी तजेलदार दिसावा असे सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी हे बऱ्याच जणींना माहित नसते. मात्र आता काळजी करण्याचे काही कारण नाही! पुढे आम्ही काही टिप्स देत आहोत, ज्या तुमचा चेहरा नेमही तजेलदार दिसावा याकरिता निश्चितच उपयोगी पडतील!         चेहरा नेहमी तजेलदार दिसावा यासाठी भरपूर प्रमाणात फलाहार घ्यावा. जेवणातही फळभाज्यांचे प्रमाण जास्त असावे.रासायनिक द्रव्ये असलेली पेये, म्हणजेच कोल्डड्रींक्स, फास्ट फूटचे सेवन टाळावे.      धुम्रपान, मद्यसेवन टाळावे.उन्हात घराबाहेर पडतानाचेहरा स्कार्फने झाकावा, परसट हॅट, फुल बाह्यांचा शर्ट, सनकोट इ.चा वापर करावा.      योग्य सनस्क्रीनचा वापर करावा. वारंवार कपाळावर आठय़ाकाढणे, राग व्यक्त करणेयामुळे सुद्धा कपाळावर घड्या पडून व्यक्ती वृद्ध दिसू लागतो. म्हणून ह्या सवयी टाळाव्यात.  चेहरा टवटवीत ठेवण्यासाठीस्वच्छ पाण्याने धुवावा. प्राणायाम, विशेषत:चेहर्‍याच्या व्यायामाच्याविशिष्ट प्रकारांचा वापरकेल्यास निश्चितच फायदा होतो.

तारुण्य पिटिकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी.

Image
किशोरवयात आल्यानंतर तारुण्यपिटीकांचा त्रास बऱ्याच जणांना सतावतो. बरेच जण यावर घरगुती उपाय करतात. प्रसंगी डॉक्टरचाही सल्ला घेतात. तारुण्यपिटीकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे…. १)      चंदन पावडर, कच्चे दूध, तुळशीची काही पाने याचा लेप बनवून चेहर्‍यावर दहा मिनिटे लावल्यास तारुण पिटीका दूर होण्यास मदत होते. २)     कडुलिंबाची पाने, कोरफडीचा गर, अंबेहळद पावडर याचा लेप बनवून चेहर्‍यावर वाळू द्यावा. त्याचा फायदा होईल. ३)      लिंबाचा रस, दही, मुलतानी माती याचे मिश्रण करून चेहर्‍यावर लावावे. पाच मिनिटांनी ओलसर बोटांनी चोळून लेप काढावा. तारुण्य पिटीका गायब होतात. ४)     संत्र्याच्या सालीची पावडर, कच्चे दूध, काकडीचा रस या मिश्रणाचा चेहर्‍यावर लेप लावल्यास तारुण्य पिटीका होत नाहीत. पुदिन्याच्या पानांचा रस रोज रात्री चेहर्‍यावर लावावा. ५)    पुटकुळ्या नाहीशा होऊन चेहर्‍यावरील कोरडेपणा जातो.त्वचेला कांती येण्यासाठी संत्र्याचा रस अत्यंत उपयुक्त आहे. ६)     बदाम आणि गुलाबाच्य...

जाणून घ्या चेहरा धुण्याची पद्धत …

Image
प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. यामुळे तो कसा धुवावा हे माहिती असणे आवश्‍यक आहे. कारण तुम्ही चेहरा नेमका कशा पध्दतीने धुता यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. चेहरा धुताना हमखास होणाऱ्या चुका कोणत्या ते जाणून घेऊ. सतत धुणे चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या नादात काहीजण वारंवार फेस वॉश व क्‍लिंझरने तो धुतात. यामुळे त्वचेचे नुकसान होते. परिणामी त्वचा कोरडी किंवा तेलकट होते. तर तुम्ही मेकअप, सनस्क्रीन व अन्य कुठले लोशन लावलेले नाही तर मग चेहरा केवळ पाण्याने धुतला तरी चालेल. अशावेळी क्‍लिझिंग एकदाच करावे व रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. चुकीच्या उत्पादनांची निवड क्‍लिंझरची निवड काळजीपूर्वक करावी. कारण त्याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. क्‍लिंझर खूप स्ट्रॉंग असू नये व खूप सौम्यही असू नये. स्क्रबिंग चेहऱ्यावरील डेड सेल्स निघुन जाण्यासाठी स्क्रबिंग उपयुक्त आहे. मात्र आठवडयातून केवळ दोन किंवा तीन वेळा स्क्रबिंग करावे. त्यापेक्षा जास्त केल्यास त्वचेचे नुकसान होते. तसेच स्क्रबिंगसाठी कापूस किंवा कपडयाचा वापर न करता बोटांचा वापर करावा. ...

डीप क्लिन्झिंग

Image
त्वचेवरील मृत त्वचा (डेड सेल्स) काढण्यासाठी डीप क्लिन्झिंग केले जाते .  त्वचेचा पोत , रंग यामुळे चांगला होतो घरच्या घरी डीप क्लिन्झिंग करण्यास पुढील Pack वापरावे :- १)      ओट मील व दही एकत्र पेस्ट करून चेहऱ्यावर लावावे .  पाच ते सात मिनिटाने हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुवावा .  ओट वापरण्याचे कारण त्वचेला स्मुथनेस येतो व डेड सेल्स चागंल्या प्रकारे निघतात . २)     डेमीरार शुगर (ब्राऊन शुगर) व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावावे .  हात ओले असताना हळूवार मसाज करून साखर विरघळेपर्यंत ठेवून मग चेहरा कोमट पाण्याने धुवावा . ३)     त्रिफळा चूर्ण व फेसवॉश क्लिन्झिंग मिल्क एकत्र करून लगेच चेहऱ्यावर लावावे .

प्रत्येक मुलीला माहीत असावे असे केश संवर्धनाचे ५ उपाय

Image
निरोगी केसांसाठीचे उपाय इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहेत पण तुमच्यासाठी सर्वात उपयोगी कोणते ते शोधणं गरजेचं आहे. बहुतांश लोकांना उपयोगी पडलेले केसांची निगा राखण्याचे हे ५ उपाय. केसांना तेल लावा तुमच्या केसांच्या निगेला डव्ह एलेक्सीर नरिष्ड शाईन हेअर ऑइल. या तेलाची जोड द्या.. त्यात आहे हिबिस्कस आणि अर्गन ऑइल जे टाळूला पोषण देते ज्यामुळे निरोगी केसांची वाढ होते. हे तेल केस धुवायची आधी किंवा नंतर वापरू शकता. दोन्हीचा परिणाम एकच - निरोगी चमकदार केस. केस त्वरित कोरडे करा केवळ केस धुणेच नाही तर, ते कोणत्या पद्धतीने कोरडे करता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. शक्यतो ब्लो ड्रायरचा वापर टाळा आणि मऊ तंतू असलेला टॉवेल वापरा. जर असा टॉवेल नसेल तर, केसातील पाणी शोषून घेण्यासाठी आणि कोरडे करण्यासाठी कॉटनचा जुना टी-शर्ट वापर. केसांच्या तळापासून सुरवात करा म्हणजेच. मुळांपासून सुरु करून टोकांपर्यंत. कोमट पाणी वापरा धुतल्यानंतर केस कसे होतात त्यासाठी पाण्याचे तापमान योग्य असणे फार महत्त्वाचे आहे. फार गरम पाण्याचा वापर टाळावा कारण त्याने डोक्यावरची त्वचा कोरडी पडते. हे त्वचा कोरडी न होऊ...