Posts

Showing posts from July, 2018

स्वच्छ आणि उजळ त्वचेसाठी

Image
डागरहित आणि उजळ त्वचा ही सर्व महिलांची पहिली आवड असते. तर जाणून घ्या त्यासाठी काही सोपे उपाय: क्लींजर-  चेहरा दोनदा क्लींजरने स्वच्छ करावा. चेहर्‍यावर मेकअप मुळीच राहता कामा नये. मेकअप निघाली नाही तर चेहर्‍यावरील पोर्स भरतील आणि पुरळ होण्याचा धोका वाढेल. स्क्रब-  चेहर्‍यावरील डेड स्किन हटवणे आवश्यक आहे तेव्हाच चेहर्‍यावर ग्लो येईल. म्हणून प्रत्येक तीन दिवसात चेहर्‍यावर स्क्रब करा. फेस पॅक-  चेहर्‍यावर स्क्रब केल्यानंतर लगेच फॅस पॅक लावा. कारण स्क्रबने चेहर्‍यावरील पोर्स खुलून जातात आणि डस्ट त्यात समावू शकतात. म्हणून स्क्रब केल्यावर हळद आणि बेसनाचे फॅस पॅक लावून घ्यावे. टोनर-  टोनरने स्किनचा पीएच संतुलित राहतं. हे चेहर्‍यावरील मोठे पोर्स लहान करतं. मॉइस्चराइजर- एकदा चेहरा पूर्णपणे स्वच्छ झाला की त्यावर माइल्ड मॉइस्चराइजर लावा. फेस ऑयल-  चेहर्‍यावर फेस ऑयल लावल्याने ग्लो येतो आणि चेहर्‍याची शुष्कता टिकली राहते. आपण आपल्या स्किन टोनच्या हिशोबाने फेस ऑयल निवडू शकता. फेस ऑयलने चेहर्‍यावरील सुरकुत्या आणि डाग मिटतात आणि चेहरा स्वच्छ दिसू...

काय आहे मॉईश्चरायझर आणि सिरम?

Image
बाजारात दर दोन दिवसांनी नवी स्कीन आणि हेअर केअर प्रोडक्ट्स येत असतात. या प्रोडक्ट्सच नेमकं काम काय, हेच आपल्याला कळतनाही. मॉईश्चरायझर असो किंवा सिरम, सगळं सारखचं वाटतं. फेशियल सिरम आणि मॉईश्चरायझरबद्दलही आपला असाच गोंधळ उडतो. या दोघांमधला नेमका फरक जाणून घेऊया... * मॉईश्चरायझर लोशन आणि क्रीम अशा दोन्ही प्रकारांमध्ये मिळतो. त्वचेला ओलावा टिकवून ठेवणं हे मॉईश्चरायझरमुळे त्वचा कोरडी पडत नाही. मॉईश्चरायझरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण असतं. यामुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो. * फेशियल सिरममुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. सिरममुळे तुमचा चेहरा ताजा, टवटवीत आणि तरूण दिसतो. सिरममध्ये 'क' आणि 'ई' जीवनसत्व असतं. तसंच यात अँटी ऑक्सिडंट्‍सही असतात. सिरममुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो. * मॉईश्चरायझरच्या तुलनेत सिरम बरंच हलकं असतं. यात अॅक्टिव्ह म्हणजे कार्यरत घटकांची संख्या बरीच जास्त असते. यातल्या मॉलेक्युल्सचा आकार खूपच लहान असल्याने सिरम त्वचेत पटकन शोषलं जातं. यामुळे त्वचेचं अधिक चांगल्याप्रकारे पोषण होतं. * सिरममुळे त्वचेचा कोरडेपणा, पिंपल्स, सुरकुत्या पडण्य...

राईस पॅक लावा, टॅनिंग घालवा

Image
ऋतू कोणताही असला तरी टॅनिंगचा धोका असतोच. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे त्वता टॅन होतो, अकाली सुरकुत्या पडतात. यावर उपाय म्हणून घरगुती फेस मास्क बनवता येईल. साहित्य :  अर्धी वाटी शिजवलेला भात, तीन छोटे चमचे हळद पावडर, दोन चमचे मीठ, एक चमचा दही, एक चमचा मध. कृती :  एका बाऊलमध्ये शिजवलेला भात  घ्या. त्यात एक चमचा मध घाला. भातात हळद पावडर, मीठ आणि दही मिसळून मिश्रण एकजीव करा. पॅक लावताना हे पेस्ट स्वरूपातलं मिश्रण चेहरा आणि मानेवर लेपस्वरूपात लावा. या मिश्रणाचा जाड थर लागायला हवा. साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांनंतर लेप पूर्णपणे सुकेल. त्यानंतर गरम पाण्याने रगडून लेप काढून टाका. आठवड्यातून चार वेळा हा लेप लावल्यास टॅनिंगपासून मुक्ती मिळेल. तांदळात चांगल्या मात्रेत अॅण्टिऑक्सिडंट तत्त्वं असतात. या गुणधर्मामुळे त्वचेतील कोलाजेनची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. या पॅकमध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळदीमधील गुणतत्त्वांमुळे त्वचेवरील घातक जीवाणू आणि विषाणूंचा बंदोबस्त होतो. सहाजिकच त्यामुळे त्वचासंसर्ग कमी होण्यास मदत होते. चेहर्‍यावरील मुरूमांचे डाग...

मॉन्सूनसाठी सौंदर्य टिप्स

Image
मेकअप :  या पावसाळी दिवसात मेकअप करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण तुम्ही पावसात थोडेही भिजलात तरी तुमचा मेकअप खराब होतो त्यासाठी फाउंडेशनच्या जागेवर फेस पावडरचा वापर करावा. डोळ्यांसाठी प्रयोगात येणारे लायनर किंवा मस्करा वॉटरप्रूफ असावा. असा मेकअप पावसात खराब होणार नाही.  केस :  या मोसमाचा आनंद घेताना केसांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात केसांवर जेल वापरू नये. कारण या काळात डँड्रफ किंवा उवा होण्याची शक्यता जास्त असते. कोमट तेलाची मालीश करावी व केसांना दीर्घकाळ बांधून ठेवावी.

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक

Image
घरात अगदी सहज सापडणारी काकडी चेहर्‍यावर चमक आणू शकते. घरी काकडीचे फेस पॅक तयार करून आपण ही दिसू शकता सुंदर. तर जाणून घ्या कसे तयार करायचे आहे हे पॅक:  अर्धी काकडी घेऊन 1-1 चमचा ओट्स, दही आणि मधासोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या. काकडीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस आणि अंड्याच्या पांढरा भाग मिसळा. 20 मिनिट ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल. 5 चमचे काकडीच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचे रस मिसळा. पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून 15 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. 3 चमचे काकडीच्या रसात 12 थेंब गुलाबपाणी आणि थोडी मुलतानी माती मिसळा. 14 मिनिट त्वचेवर लावून ठेवावे नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्सही नाहीसे होतात. चमचा एलोवेरा जेल किंवा रसात किसलेली काकडी मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटानंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल.  चमचे बेसनामध्ये 2-3 चमचे काकडीचा रस मिसळा. 20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने त्वचेवरील डाग दूर ह...

उन्हाळ्यात काळजी घ्या 'लुक'ची !

Image
उन्हाळ्यात ऊन, धूळ व घामामुळे त्वचा तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअप बदलणेसुद्धा गरजेचे आहे. थंडीपेक्षा या मोसमात मेकअप कमी करायला पाहिजे. चेहर्‍याला 'नॅचरल लुक' देण्याचा प्रयत्न करावा. त्वचा डागरहित असेल तर फाउंडेशनचा प्रयोग करू नये. चेहर्‍यावर थोडे लिक्विड मॉइश्चराइझर आणि बेबी पावडर लावल्याने चेहर्‍याला 'ट्रान्सल्युसेंट' लुक मिळेल. रात्रीच्या वेळी पार्टीला जात असाल तर चेहर्‍यावर लिक्विड फाउंडेशन हा सर्वांत चांगला पर्याय आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीमयुक्त मॉइश्चराइझरचा वापर करायला पाहिजे. फाउंडेशन किंवा ब्लशर हलक्या हाताने लावा. चेहर्‍याचे डाग लपवायचे असतीलल तर फाउंडेशन किंवा पावडर लावायच्या आधी कंसीलर लावायला पाहिजे. कंसीलर एका छोट्याशा ब्रशने लावून वर थोडी पावडर लावावी. नॅचरल लुकसाठी लिपस्टिकच्या जागी लिंप-ग्लास लावावे. रात्री चेहरा आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक लिंप ब्रशच्या मदतीने लावावी. उन्हाळ्यात दिवसा लाइट ब्राउन, रोज, पिंक आणि रात्री ब्रांज, कोरल, कॉपर आणि बरगंडी रंगांच्या लिपस्टिकचा वापर करायला हवा. त्यामुळे चेहर्‍याच्या स...

प्रश्न चेहर्‍यावरील मसचा

Image
चेहर्‍यावर आलेला मस किंवा चामखीळ हा सौंदर्याला बाधक असतो. खरेतर मस किंवा चामखीळ शरीरावरील कोणत्याही भागावर येऊ शकतो. पण चेहर्‍यावर एकापेक्षा अधिक मस असणे त्रासदायक वाटते कारण त्यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. हे मस किंवा चामखीळ घालवण्यासाठी शेकडो उपाय करून पाहिले जातात. पण जर तुम्ही मस किंवा चामखीळमुळे त्रासलेले असाल तर काही घरगुती उपायांनी मस किंवा चामखीळपासून कायमची सुटका मिळवता येईल. ई जीवनसत्त्व :  दिवसातून रोज दोन वेळा ई जीवनसत्त्वाच्या तेलात आले मिसळून मस किंवा चामखीळीवर लावा. एक दोन आठवड्यात मस किंवा चामखीळ निघून जातील. सफरचंदाचे व्हिनेगर :  एका कापसाच्या बोळ्यावर अ‍ॅप्पल व्हिनेगर किंवासफरचंदाचे व्हिनेगर मस किंवा चामखीळ असलेल्या जागी पंधरा मिनिटे चोळावे. रोज याचा वापर केल्यास काही आठवड्यात मस किंवा चामखीळ गळून पडेल. सुक्या अंजीराचा रस :  दिवसातून चार वेळा मस किंवा चामखीळ असलेल्या जागी हा रस लावा. काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. अंजिराच्या रसात असलेले क्षारयुक्त आम्ल मस किंवा चामखीळ यापासून सुटका देईल. मेथी दाणे :  ...