Posts

केसांसाठी फायदेशीर पेरूची पाने

Image
पेरू खाण्याचे अनेक फायदे आहे परंतू पेरूची पाने केसांसाठी औषधाचे काम करतात. अलीकडेच एका संशोधनात समोर आले आहे की केस गळतीवर औषधाप्रमाणे वापरले जाऊ शकतात पेरूची पाने. याने कसे दाट होतात आणि कोंड्यापासून मुक्ती मिळते. एवढंच नाही तर हे वापरल्याने केस सॉफ्ट आणि शाईनी दिसतात. असे तयार करायचे लोशन 1 लीटर पाणी उकळवून त्यात पेरूच्या झाडाचे पानं टाकावे. 20 मिनिटापर्यंत उकळी येऊ द्यावी. गार झाल्यावर गाळून घ्यावे. असे लावावे सर्वात आधी शांपूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. कंडिशनर लावू नये. केस वाळल्यावर ते चार भागात वाटून त्यावर लोशन लावावे. कमीत कमी 10 मिनिट टाळूवर मसाज करावी. आता दोन तासासाठी असेच राहू द्यावे. वाटल्यास टॉवेलमध्ये केस गुंडाळून रात्रभर असेच झोपू शकता. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाकावे. हे लोशन आठवड्यातून तीनदा लावू शकता. ही काळजी घ्या लोशन रूम टेंपरेचरवर गार करावे. गरम लावू नये.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी मधाचे 5 उपाय

Image
डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणं आहेत, जसे योग्य डाइट न घेणे, शरीरात पोषक तत्त्वांची कमी, कमजोरी, झोप पूर्ण न होणे आणि इतर. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊनही डार्क सर्कल्स जात नसतील तर काही घरगुती उपायाने हे दूर केले जाऊ शकतात. मधात नैसर्गिक रूपात ब्लिचिंग गुण आढळतात ज्याने सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यात मदत मिळते. याच्या अॅटीऑक्सीडेंट प्रकृतीमुळे डार्क सर्कलवर हे खूप प्रभावी ठरतं. जाणून घ्या कश्या प्रकारे हे डार्क सर्कल्स दूर करण्यात मदत करतं ते: शुद्ध मध:  डार्क सर्कल्स वर मधाची एक पातळ लेअर लावा आणि 20 मिनिटापर्यंत हळूवार मालीश करा. नंतर पाण्याने धुऊन टाका. मध, व्हि‍टॅमिन इ आणि अंड्यातील पांढरा भाग: व्हिटॅमिन इ कॅप्सूल वाटून त्यात मध आणि अंड्यातील पांढरा भाग मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली लावा. वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. मध आणि बदाम:  सम प्रमाणात मध आणि बदामाचे तेल मिसळा. हे डोळ्या जवळच्या भागाला लावून हलक्या हाताने मालीश करा. रात्री असेच राहून द्या. सकाळी उठून घुऊन टाका. मध आणि केळ:  एका बाऊलमध्ये मध आणि तेवढ्या प्रमाणात केळ मिसळा. डार्क सर्क...

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक

Image
घरात अगदी सहज सापडणारी काकडी चेहर्‍यावर चमक आणू शकते. घरी काकडीचे फेस पॅक तयार करून आपण ही दिसू शकता सुंदर. तर जाणून घ्या कसे तयार करायचे आहे हे पॅक: * अर्धी काकडी घेऊन 1-1 चमचा ओट्स, दही आणि मधासोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या. * काकडीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस आणि अंड्याच्या पांढरा भाग मिसळा. 20 मिनिट ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल. * 5 चमचे काकडीच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचे रस मिसळा. पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून 15 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. * 3 चमचे काकडीच्या रसात 12 थेंब गुलाबपाणी आणि थोडी मुलतानी माती मिसळा. 14 मिनिट त्वचेवर लावून ठेवावे नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्सही नाहीसे होतात. * 1 चमचा एलोवेरा जेल किंवा रसात किसलेली काकडी मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटानंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल. * 2 चमचे बेसनामध्ये 2-3 चमचे काकडीचा रस मिसळा. 20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने त्वचेवरील डा...

चेहर्‍यानुसार निवडा इयररिंग्‍स

Image
सध्या वेगवेगळ्या इरयरिंग्सची फॅशन आहे तरी प्रत्येक शेप आणि साइजचे कानातले प्रत्येकावर उठून दिसत नाही. म्हणून आवश्यक आहे जाणून घेणे की आपल्या चेहर्‍याच्या आकाराप्रमाणे आपल्यावर कसे कानातले शोभून दिसतील. > > राउंड गोल चेहर्‍याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्‍यावर सूट करणार नाही. म्हणून ड्राप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील. स्क्वेअर चेहरा स्क्वेअर असल्यास आपल्याला चेहर्‍याला सौम्यता प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा. रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. स्क्वेअर आकाराचा दागिणा टाळा. लोंबत असलेले झुमके किंवा ड्राप निवडा. स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता. रेक्टेंगल आयताकृती चेहर्‍यावरही स्टड्स किंवा कानाला चिटकून असणारे झुमके छान दिसतील. टिपीकल स्टडऐवजी मार्डन, चंकी फंकी स्टड निवडा. बटनस्टाइल किंवा गोल कानातलेही आपल्यावर उठून दिसतील. हार्टशेप हृदयाकार चेहर्‍यासाठी झुमके सर्वात उत्तम पर्याय आहे. वरून पातळ आणि खालून रुंदीला अधिक झुमके छान दि...

सौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे

Image
टूथपेस्टचा वापर केवळ दातांसाठी नव्हे याने इतर समस्या जसे चेहर्‍यावरील डाग, पुरळ, सुरकुत्या यावरही केला जाऊ शकतो. खरं म्हणजे सौंदर्य वाढीसाठी टूथपेस्ट वापरले जाऊ शकतं. स्त्रियाच नव्हे तर पुरुषही आपल्या त्वचेवर याचा उपयोग करू शकतात. पिंगमेंटेशन सारखे काम करत असल्यामुळे टूथपेस्टने त्वचा उजळते. बघू याचे उपयोग: * डार्क स्पॉट हटविण्यासाठी अर्धा चमचा टोमॅटो रसात अर्धा चमचा टूथपेस्ट मिसळा. यात 1 चमचा बेकिंग सोडा घालून फेटून घ्या. त्वचेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा ही विधी अमलात आणू शकता. * पिंपल्स दूर करण्यासाठी 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे टूथपेस्ट मिसळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहर्‍यावर लावा. कोमट पाण्याने धुऊन टाका. * दोन तोंडी केसांपासून मुक्तीसाठी एका बाऊलमध्ये केळ मॅश करून घ्या. त्यात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट दोन तोंडी केसांवर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर केस धुऊन टाका. महिन्यातून एकदा हा प्रयोग करावा. * ओठांवर चमक हवी असल्यास 1 चमचा मधात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट ओठांवर...

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क

Image
सर्वात आधी एलोवेरा स्कीनसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे पाहू: त्वचेची टॅनिंग, रॅशेज, सुरकुत्या, पुरळ या सर्वांवर एलोवेरा प्रभावी आहे. याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा नरम राहते. याने त्वचा मॉइश्चराइच राहते. एलोवेराने त्वचेवरील जखमदेखील बरी होते. याने स्कीन टोन होते. त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी: एलोवेरा टी ट्री ऑइल मास्क 1 चमचा एलोवेरा जॅल मध्ये 7-8 थेंब टी ट्री ऑइल मिसळून हे मास्क रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी चेहरा पाण्याने धुवावा. > टॅनिंग आणि सनबर्न मिटवण्यासाठी: एलोवेरा- कुकम्बर मास्क 1 लहान काकडीची प्युरी तयार करा. यात 2 चमचे एलोवेरा जॅल मिसळा. एका चमच्यात 1 एस्पिरिन टॅबलेट घोळून घ्या. ही पेस्ट इतर मिश्रणासोबत मिसळून तयार मास्क 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा. नंतर स्वच्छ करून घ्या. > त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी: एलोवेरा-ओट्स-ओनियन मास्क एका बाऊलमध्ये अर्धा कप फ्रेश एलोवेरा जॅल घेऊन त्यात अर्धा कप कांद्याचा रस आणि 1 चमचा ओट्स मिसळा. तयार स्क्रबरने स्कीनवर मसाज करा. उजळ आणि चमकदार त्वचेसाठी: एलोवेरा-हनी मास्क एका बाऊलमध्ये 1 लहान चमचा द...

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी घरी बनवा कंसीलर

Image
डार्क सर्कल्स लपवण्यासाठी कंसीलरची मदत घेणे सामान्य झाले आहे. पण बाजारात उपलब्ध कंसीलर केमिकलयुक्त असतात त्यापेक्षा कंसीलर घरीही तयार केलं जाऊ शकतं. मध, कोरफड जेल, जिंक ऑक्साइडर मिसळून कंसीलर तयार केलं जाऊ शकतं. मधाने स्किन टोन आणि टेक्सचर सुधारतं. तसेच कोरफड जेल, कंसीलरला स्मूथ बनवतं आणि डोळ्याच्या स्किनला व्हिटॅमिन ए आणि इ प्रदान करतं. तसेच जिंक ऑक्साइड स्किनला यूव्ही रेजपासून बचाव करतं. आणि स्किनला मॉइश्चर करतं. हे सगळं मिक्स केल्यावर यात कोकोआ पावडर घालण्यात येते. स्किन टोनपेक्षा हलका कलर तयार व्हावा एवढीच कोकोआ पावडर मिसळावी. कसे वापरावे डोळ्याखाली कंसीलर लावण्यापूर्वी चेहर्‍यावर मॉइस्चरायझर लावून घ्या नंतर एसेंशियल ऑइल. आता कंसीलर डोळ्याच्या आतील कोपर्‍यापासून बाहेरपर्यंत पसरून घ्या. अधिक प्रमाणात न वापरता एक-दोन थेंब पुरेसे होतील. काही वेळासाठी कंसीलरला सेट होऊ द्या नंतर हलक्या हाताने स्किनला थापडा आणि कंसीलरला पूर्ण स्किनमध्ये ब्लेड करून घ्या.